श्रेया घोषालने पहिल्यांदाच दाखवली तिच्या अडीच महिन्याच्या मुलाची झलक; म्हणाली, ‘तू माझ्या जीवनात आला आणि…’


बॉलिवूडमधील आघाडीची गायिका श्रेया घोषाल सध्या खूपच आनंदात आहे. याच वर्षी श्रेयाने एका मुलाला जन्म दिला आहे. सध्या ती तिचे मातृत्व एन्जॉय करत आहे. श्रेयाने मे महिन्यात तिच्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर बऱ्याच दिवसांनी तिने तिच्या बाळाचा पहिला फोटो शेअर केला आहे.

श्रेयाने शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचा चेहरा जरी दिसत नसला, तरी तिने तिच्या बाळाला हातात पकडले असून, ती त्याच्याकडे प्रेमाने बघत आहे. श्रेयाने तिच्या मुलाचे नाव ‘देवयान’ ठेवले असून, या फोटोच्या निमित्ताने पहिल्यांदाच तिने तिच्या बाळाची झलक दाखवली आहे. श्रेयाचे बाळ केवळ अडीच महिन्यांचे असूनही त्याचे केस खूपच दाट आणि कुरळे दिसत आहे.(shreya ghoshal shared son devyaan picture)

 

हा फोटो शेअर करताना श्रेयाने लिहिले, “तू नेहमीच माझ्या कुशीत राहतो, तरीही माझे मन भरत नाही. माझे हृदय अजूनही तुझे आहे, आयुष्यभरासाठी. तू माझ्या जीवनात आला आणि माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या बदलून गेली. माझा गोड मुलगा देवयान, आई तुझ्यावर खूप प्रेम करते.”

श्रेयाने मार्च २०२१ मध्ये तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. त्यानंतर तिने २२ मे २०२१ ला मुलाला जन्म दिला. या मुलाचे नाव तिने ‘देवयान’ ठेवले असून, याचा अर्थ ‘देवाचा रथ’ असा होतो. श्रेयाने २०१५ साली तिचा मित्र शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न केले. श्रेयाने ‘देवदास’ सिनेमातून गायनाच्या करियरची सुरुवात केली. या सिनेमासाठी तिला फिल्मफेयर आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रेयाचे काही दिवसांपूर्वीच ‘मिमी’ सिनेमातील ‘परमसुंदरी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. या गाण्यावर एक्सप्रेशन देताना श्रेयाने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता ज्याला अमाप लाइक्स आणि कमेंट्स आल्या. श्रेया खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायिका आहे. तिला सोशल मीडियावर २२.३ मिलियन फॉलोवर्स आहे. नुकतेच तिचे ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटातील ‘जालिमा कोका कोला पिला दे’ हे नोरा फतेहीवर चित्रित झालेले गाणे रिलीझ झाले असून, याला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

-निळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं मृण्मयी देशपाडेचं रूप, फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

-मयुरी देशमुखच्या नव्या लूकने वेधले चाहत्यांचे मन; काळ्या डॉटेड पोल्कोमधील फोटो झाला व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.