Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

मराठीसोबतच हिंदीमध्ये यश मिळवलेल्या श्रेयश तळपदेने दिला आहे ‘या’ साऊथ सुपरस्टार अभिनेत्याला आवाज

आज (२७ जानेवारी) मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधे नावलौकिक कमावलेला अभिनेता श्रेयश तळपदे त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. सुपरहिट अशा ओम शांती ओम सिनेमात श्रेयसने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. बहुतकरून आपल्या विनोदी भूमिकांसाठी श्रेयश ओळखला जातो. मराठी सिनेसृष्टीमधे त्याने मालिका, चित्रपट आदी सर्वच माध्यमांमध्ये काम करत यश संपादन केले. मोजक्या मात्र उत्तम कलाकृती करण्यासाठी श्रेयश ओळखला जातो. त्याने त्याच्या प्रतिभेने मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये यश मिळवले आहे. जाणून घेऊया श्रेयशबद्दल अधिक माहिती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

श्रेयसने वयाच्या २० व्या वर्षी त्याच्या करियरची सुरुवात केली. अभिनयासोबतच श्रेयसने दिग्दर्शन, निर्मिती आणि व्हॉइस आर्टिस्ट आदी माध्यमांमध्ये देखील काम केले. कोणत्याही गॉडफादर शिवाय श्रेयश या इंडस्ट्रीमध्ये आला आणि यशस्वी झाला. त्याचा जन्म २७ जानेवारी १९७६ रोजी मुंबईत झाला. कॉलेजमध्ये असताना त्याने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे तो मराठी मालिकांमध्ये दिसू लागला. या दरम्यान तो रंगभूमीवर देखील कार्यरत होता. हिंदीमध्ये त्याने दिग्दर्शक नागेश कुन्नूर यांच्या ‘इकबाल’ सिनेमातून पदार्पण केले. या सिनेमात त्याने साकारलेला मूकबधिर क्रिकेटर चांगलाच गाजला. सिनेमा चांगलाच हिट झाला, अनेक पुरस्कारांनी त्याला गौरवले गेले. पुढे तो ओम शांति ओम, गोलमाल सीरीज, वाह ताज आदी चित्रपटांमध्ये झळकला. मराठी आणि हिंदीमध्ये त्याने जवळपास ४५ चित्रपटांमध्ये काम केले.

एका मुलाखतीमध्ये श्रेयसने त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले. तो म्हणाला होता, “मी कधीच करण जोहर आणि यशराज यांच्यासोबत काम केले नाही. याचा अर्थ असा नाही की उत्तम अभिनेता नाही. एक काळ असा होता जेव्हा माझ्याकडे सॅन्डविच घ्यायला, भाडे द्यायला देखील पैसे नव्हते. मी स्टुडिओमध्ये ऑडिशनला जायचो तेव्हा बसने कधी तिकीट ना काढता देखील गेलो आहे.” मोठ्या मेहनतीने आणि संघर्षाने श्रेयसने हे यश मिळवले आहे. आज श्रेयश हिंदी आणि मराठीमध्ये प्रसिद्ध आणि ओळखीचा चेहरा बनला आहे. २०२१ मध्ये रेकॉर्डतोड कमाई करणाऱ्या ‘पुष्पा’ सिनेमातील अल्लू अर्जुन या पात्रासाठी त्याने हिंदीमध्ये डबिंग केले होते. यायाधी त्याने ‘द लायन किंग’च्या हिंदी वर्जन मध्ये हॉलीवुड अभिनेता बिली आयशरच्या भूमिकेला आवाज दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
लाखो चाहत्यांना प्रेमात पाडणारी मौनी रॉय, पहिल्याच भेटीत सुरज नांबियरवर झाली होती फिदा
Ashram 3 | बॉबी देओलसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल बोलली ईशा गुप्ता; म्हणाली, ‘मी तर दहा…’

 

हे देखील वाचा