Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

श्रेयश तळपदेच्या तब्येतीत सुधारणा, ‘या’ दिवसापासून सुरु करणार ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाची शूटिंग

अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyash Talpade) सध्या डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेत आहे. पण लवकरच तो शूटिंगवर परतणार आहे. अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगवरून परतत असताना त्याची तब्येत बिघडली आणि पत्नी दीप्तीने त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे अँजिओप्लास्टीनंतर त्याची प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांनी त्याला १२ फेब्रुवारीनंतर शूटिंग सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

बरा झाल्यानंतर श्रेयस तळपद ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटासाठी शूटिंग करेल, असे मानले जात होते. मात्र या चित्रपटापूर्वी तो एका नव्या चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता अक्षय कुमारची तारीख मिळाल्यानंतरच ‘वेलकम टू द जंगल’चे शूटिंग सुरू होणार आहे. दरम्यान, निर्माते अनंत कुमार गुप्ता यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगची तयारी सुरू केली असून, त्यात श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे 27 फेब्रुवारीपासून इंदूरमध्ये ‘नया दौर’ चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. या चित्रपटासाठी इंदूरमध्ये मोठा सेट उभारला जात आहे. या चित्रपटाचे कलादिग्दर्शक लीलाधर सावंत उद्या मंगळवारी त्यांच्या टीमसह इंदूरला रवाना होत आहेत आणि महिनाभर तेथे चित्रपटाचे सेट तयार करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग 27 फेब्रुवारीपासून महिनाभर इंदूरमध्ये सुरू राहणार आहे.

‘नया दौर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असलेले रवींद्र राम पाटील सांगतात, ‘श्रेयस तळपदे आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे पण डॉक्टरांनी त्याला १२ फेब्रुवारीपर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. श्रेयस तळपदे यांनी सांगितल्यानुसार आम्ही शूटिंगचे वेळापत्रक तयार केले आहे. मलाही वाटत होतं की श्रेयस पहिल्यांदा ‘वेलकम टू द जंगल’चं शूटिंग करेल, पण अक्षय कुमारच्या डेटमुळे सिनेमाचं शूटिंग पुढे गेलं. मी माझ्या चित्रपटाबद्दल बोललो आणि श्रेयसने काम करण्यास ग्रीन सिग्नल दिला.

‘नया दौर’ चित्रपटात श्रेयस तळपदेशिवाय अन्नू कपूर आणि प्रणव वत्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात तीन गाणी आहेत, ज्याचे संगीत अमित त्रिवेदी आणि विशाल मिश्रा यांनी दिले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रवींद्र राम म्हणतात, ‘या चित्रपटाचा विषय अतिशय अनोखा आणि सामाजिक नाटकावर आधारित आहे. इंदूरशिवाय या चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

नवीन वर्षात रणबीर कपूरच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का, राजूसोबतच्या चित्रपटाचे नवीन अपडेट समोर
बॉक्स ऑफिसवर प्रभासच्या ‘सालार’चा दबदबा, फक्त हिंदी व्हर्जनमध्ये कमावले 150 कोटी

हे देखील वाचा