मोठ्या पडद्यावर नारीसामर्थ्याची प्रभावी गाथा उलगडणारा मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ येत्या ३ जुलै २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रेयस तळपदे प्रस्तुत, ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओ डी आय ग्रुप निर्मित हा सिनेमा स्त्रीशक्तीचा सशक्त, प्रेरणादायी आणि भावनिक आविष्कार मांडतो.
प्रत्येक स्त्रीच्या अंतरंगातील मर्दिनीला जागं करणारी ही कथा केवळ संघर्ष दाखवत नाही, तर स्त्रीच्या संयम, धैर्य आणि आत्मबळाची ठाम ओळख करून देते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये ठाम पाऊल, उग्र भाव आणि ज्वालांनी वेढलेलं ‘मर्दिनी’ हे नाव दिसून येतं, ज्यातून चित्रपटाची तीव्रता आणि आशय स्पष्ट होतो.
चित्रपटात प्रार्थना बेहेरे,(Prarthana Behere) अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले यांच्या सशक्त भूमिका पाहायला मिळणार आहेत. यासोबतच बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिका कथेला वेगळी भावनिक उंची देते, असं म्हटलं जात आहे.
अजय मयेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट असून, दिप्ती तळपदे यांच्या निर्मितीखाली ‘मर्दिनी’ साकारत आहे. सहनिर्माती टिना राकेश कोठारी आहेत. चित्रपटाचं छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक, तर पटकथा व संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिले आहेत.
ताकदीला आवाज आणि धैर्याला दिशा देणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट ३ जुलै २०२६ पासून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून, तो प्रेक्षकांना विचार करायला आणि प्रेरित व्हायला नक्कीच भाग पाडेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
नात्यांच्या गुंत्यातील मनोव्यापार उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित


