14 डिसेंबर रोजी मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyash talpade) हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला तात्काळ बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अभिनेत्यावर अँजिओप्लास्टी केली जी यशस्वी झाली. आता श्रेयस तळपदे याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून आता त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रेयस तळपदेचा जवळचा मित्र सोहम शाह याने अभिनेत्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, ‘मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्याच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळी त्याला डिस्चार्ज मिळेल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. आज सकाळी तो आमच्याकडे पाहून हसला. आम्हा सर्वांसाठी हा दिलासा होता.
याशिवाय सोहमने श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदेचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘मी दीप्तीचे मनापासून आभार मानू इच्छितो की तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर विनाविलंब रुग्णालयात दाखल करणे खूप आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीत मला दीप्तीच्या मेंदूचे कौतुक करायचे आहे..’
श्रेयसचे हृदय दहा मिनिटे थांबले होते. बॉबी देओलने ही माहिती दिली. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, ‘मी नुकतेच त्याच्या पत्नीशी बोललो. ती खरच अस्वस्थ झाली होती. सुमारे दहा मिनिटे त्यांचे हृदय थांबले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून डॉक्टरांनी त्यांना पुन्हा जीवनदान दिले आहे. त्यामुळे तो बरा होवो हीच प्रार्थना.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
रणबीर कपूरचा ऍनिमल 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील! जाणून घ्या 16 व्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
एसएस राजामौली यांनी खरेदी केले ‘सालार’चे पहिले तिकीट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल