लोकसभा निवडणूक 2024 च्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. यावर्षी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना देखील तिकीट मिळालं होतं. बॉलीवूडमधील अभिनेत्री कंगना परानौत हिला मंडी मतदारसंघातून तिकीट मिळालं होतं. तिने पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत तिला दणदणीत विजय प्राप्त झालेला आहे .
कंगनाने विक्रमादित्य सिंग यांना मागे टाकत आघाडी घेतलेली आहे. कंगनाने पोस्ट शेअर करत सगळ्या मतदारांचे आभार मानलेले आहेत. ही पोस्ट शेअर करत कंगनाने लिहिले आहे की, “तुम्ही दाखवलेल्या विश्वासाने दिलेल्या प्रेम यासाठी समस्त मंडीवासीयांचे मी आभार मानते. हा विजय तुम्हा सर्वांचा आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजीपावरील विश्वासाचा हा विजय आहे .सनातन धर्म आणि मंडीच्या सन्मानाचा हा विजय आहे.”
कंगनाने केलेल्या या पोस्टवर अनेक लोक कमेंट करत आहेत. अशातच आता मराठी अभिनेता श्रेयस तळपदे यांनी देखील कंगनाच्या या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यांनी कमेंट करून तिला शुभेच्छा दिलेले आहेत
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच केलं मतदान
कायदेशीर वादानंतर रणबीरच्या चित्रपटाचे नाव बदलणार, या ‘केरळ स्टोरी’ अभिनेत्रीची एन्ट्री