Monday, July 1, 2024

स्टाईल आयकॉन बनत आहे सचिन पिळगावकरची लाडकी लेक; पाहा श्रियाचा हा ‘हटके’ अंदाज

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लाडकी लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरने अगदी कमी वयात खूप नाव कमावले आहे. अल्पावधीतच तिने चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत राहते. ती दिवसागणिक स्टाईल आयकॉन बनत चालली आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक नजर टाकली की ही बाब सहज तुमच्या लक्षात येईल.

नुकतेच श्रियाने स्वतःचे एक फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. याद्वारे तिच्या फॅशन सेन्सचं दर्शन चाहत्यांना घडलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्रीने फ्लॉवर प्रिंटेड ओव्हरसाईझ शर्ट आणि सोबत त्याच पॅटर्नची पँट परिधान केली आहे. सोबतच तिने लो पोनी बांधली आहे. या स्टायलिश लूकमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत आहे.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते यावर सातत्याने कमेंट करून तिच्या फॅशन स्टेटमेंटचं कौतुक करत आहेत. तसेच ही पहिलीच वेळ नाहीये, तर या अगोदरही तिचे असे फोटोशूट्स बऱ्याचदा व्हायरल झाले आहेत.

कामाबद्दल बोलायचे झाले, तर श्रिया लवकरच ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती ‘अरुंधती’चे पात्र साकारणार आहे, जी एक पत्रकार असते. यात तिच्यासोबत पुलकित सम्राट, झोया हुसेन आणि राणा दुग्गाबत्ती मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच चित्रपट तेलगू भाषेत ‘अरण्य’ म्हणून, तर तमिळमध्ये ‘कदान’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

-आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

-सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा