Monday, June 17, 2024

‘या’ कारणाने शाळेत नाव बदलुन जात होती साउथ आणि बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हसन

अभिनेत्री श्रुती हसनने साउथपासुन बाॅलिवूड इंडस्ट्रीपर्यंत तिच्या अभिनयाचा जलवा पसरवला आहे. सुपरस्टार कमल हसनची हा लाडली फक्त दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीवरंच राज्य करत नाही. तर तिने ‘रॉकी हँडसम’, ‘गब्बर इज बॅक’, ‘वेलकम बॅक’, ‘दिल तो बच्चा है जी’ यांसारख्या चित्रपटांसोबत बाॅलिवूडमध्येही तिच्या अभिनय कौशल्य सिद्ध करुन दाखवलं आहे. कमल हसन आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सारिका यांची मुलगी श्रुती हसन तिच्या दमदार चित्रपटामुळे आणि तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिचे बोल्ड विचीर जाहीरपणे मांडायला माघेपुढे पाहात नाही. यामुळेच तिचे नाव नेहमीच चर्चेत असते. आज ही अभिनेत्री तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तच जाणुन घेऊया तिच्या संबंधी काही खास गोष्टी.

श्रुती हसनचा जन्म 28 जानेवारी 1986ला चेन्नईमध्ये झाला होता. परंतु हि गोष्ट अनेकांना माहिती नाही की, श्रुती तिच्या आई-वडिलांच्या लग्नाआधीच या जगात आली होती. खरंतर कमल हसन(Kamal Hasan) आणि सारिका हे दोघं ‘लिव इन रिलेशनशीपमध्ये ‘ राहत होते. यादरम्यान सारिका प्रेग्नंट झाल्या आणि त्यांनी श्रुतीलै जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी 1988मध्ये सारिका(Sarika) आणि कमल हसनने लग्न केलं. श्रुतीचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण चेन्नईतंच झालं. श्रुतीच्या शालेय आयुष्यातील काही गोष्टीदेखील अशाच मनोरंजक आहेत.

श्रुतीच्या बालपणीच्या गोष्टीमध्ये असे अनेक खास किस्से आहेत. त्यातीलंच एक म्हणजे श्रुती लहानपणी तिचं नाव बदलुन शाळेत शिकायला जायची. असं करण्यामागचे कारणंही खुप मनोरंजक आहे. तिच्या मित्रांना ती सुपरस्टारची मुलगी आहे हे कळु नये म्हणुन तिने ही शक्कल लढवली होती. तिला तिची आई सारिका आणि वडील कमल हसन यांचं नाव उघड करायचं नव्हतं. त्यामुळे ती तिची ओळख लपवुन शाळेत जात होती. श्रुतीने शाळेत तिचं नाव पुजा रामचंद्रन असं ठेवलं होतं.

श्रुतीने(Shruti Hasan) हे पाउल उचलण्यामागे तिच्या शिक्षक आणि शाळेतील इतर मुलांकडुन मिळणारी स्पेशल ट्रीटमेंटपासुन वाचनं इतकंच होतं.कारण ती सुप्रसिद्ध व्यक्तींमधील एक असणारे सारिका हसन आणि कमल हसनची मुलगी होती. हे जरी खरं असलं तरी असाही दावा आहे की, तिच्या आई-वडीलांनीच तिचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता कारण त्यांना अशी भीती होती की, त्यांच्या विवादास्पद विवाहामुळे आणि श्रुतीच्या जन्मामुळे तिला सर्वजण चिडवतील. कारण श्रुतीचा जन्म त्यांच्या लग्नाआधी झाला होता.त्यामुळे या गोष्टींबद्दल वेगवेगळे दावे केले जातात.

हे देखील वाचा