Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘असा लाजरान साजरा मुखडा!’ श्रुती मराठेच्या साडीतील निरागस अदा लावतायेत चाहत्यांना वेड

श्रुती मराठे ही मराठी चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या दिवसांत ती चित्रपटांपेक्षा, तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे खूप चर्चेत असते. एकापेक्षा एक फोटो शेअर करून, ती चाहत्यांना वेड लावण्यात कोणतीही कसर बाकी सोडत नाही. तिचा चाहतावर्ग देखील भलामोठा आहे. म्हणूनच तिचे फोटो मोठ्या प्रमाणत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सतत तिचे नवनवीन फोटोशूट समोर येत असतात. तिचा दिलखेचक अंदाज नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो.

आता नुकतेच श्रुतीने काही फोटो शेअर केले आहेत, जे नेहमीप्रमाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. अभिनेत्रीने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यामध्ये श्रुती साडीमध्ये दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, यामध्ये तिने काळ्या आणि केशरी रंगाची सुंदर साडी नेसली आहे. मोजके दागिने, केसांची वेणी आणि कपाळी छोटीशी टिकली लावून तिने तिचा हा साडी लूक पूर्ण केला आहे. (shruti marathe saree make you fall in her love)

या फोटोमधील श्रुतीची निरागस अदा कोणालाही तिच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेशी आहे. नेहमीप्रमाणेच तिच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहते कमेंट्स करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. आतापर्यंत या फोटोवर ४८ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत, तर कमेंट्सचाही पूर आलेला पाहायला मिळत आहे.

श्रुती अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांनी मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम काम करून आपले नाव कमावले आहे. श्रुतीने मराठीसोबत तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयासोबतच, ती सोशल मीडिया पोस्टनेही प्रेक्षकांना प्रभावित करते. दरदिवशी तिचे फोटो मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा