Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

श्रुती मराठेने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट; ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ लूकला नेटकऱ्यांची पसंती

मराठी चित्रपटसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे या दिवसांत तिच्या पोस्ट्समुळे खूप चर्चेत आहे. एका पेक्षा एक फोटो शेअर करून, ती चाहत्यांना वेड लावण्यात कोणतीही कसर बाकी सोडत नाहीये. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय राहून, तिचे वेगवेगळे फोटोशूट या ठिकाणी शेअर करताना दिसते. नुकतेच तिने एक फोटोशूट पोस्ट केले आहे, ज्यावर आता चर्चा रंगल्या आहेत.

श्रुती मराठेने नेहमीप्रमाणेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या अदा कोणालाही तिच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेश्या आहेत. यात श्रुती बबली स्लीव्ह्ज असलेल्या शॉर्ट पिंक ड्रेसमध्ये दिसली आहे. सोबतच परफेक्ट असा मेकअप करून, अभिनेत्रीने लो पोनी बांधलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ती यामध्ये ज्याप्रकारे फोटोसाठी पोझ देत आहेत, ते पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झाले आहेत. तिचा हा अंदाज चाहत्यांना चांगलाच आवडल्याचे दिसून येत आहे.

नेहमीप्रमाणेच श्रुती यामध्येही खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “शिकणे, ऐकणे, वाढणे आणि प्रयोग करणे हे मी चालूच ठेवते.” यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये एक नजर टाकली, तर तुम्हाला ते लाल हार्ट ईमोजी आणि फायर ईमोजीने भरलेले दिसेल. (shruti marathe shared photoshoot in pink outfit )

श्रुतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांनी मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम काम करून आपले नाव कमावले आहे. श्रुतीने मराठीसोबत तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिमानास्पद! ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२१’ने उर्वशी रौतेलाचा गौरव; फोटो अन् व्हिडिओ केला शेअर

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा