Wednesday, April 30, 2025
Home अन्य इंग्रजीमध्ये सतत चुका करणाऱ्या अंगुरी भाभीचं ‘एवढं’ झालंय शिक्षण, ऐकून व्हाल चकित

इंग्रजीमध्ये सतत चुका करणाऱ्या अंगुरी भाभीचं ‘एवढं’ झालंय शिक्षण, ऐकून व्हाल चकित

‘भाभीजी घर पर है’ मधील अंगूरी भाभीची भूमिका प्रेक्षकांकडून चांगलीच पसंत केली गेली आहे. तिचा निरागसपणा चाहत्यांना खूप हसवतो आणि तिचे चुकीचे इंग्रजी ऐकूनही सगळे लोटपोट होतात. एकूणच, अंगूरी भाभी ही या शोच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शुभांगी अत्रेबद्दल (Shubhangi Atre) बोलूयात. तर अभिनेत्रीला इंग्रजीच्या बाबतीत हलक्यात घेण्याची चूक अजिबात करू नका.

बरीच शिकलेली आहे शुभांगी अत्रे
शुभांगी अत्रेच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री बरीच शिकलेली आहे. तिच्या शिक्षणाबद्दल जाणून तुम्हीही थक्क व्हाल. मूळच्या मध्य प्रदेशातील असणाऱ्या शुभांगी अत्रेने एमबीए केले आहे. मात्र अभिनयाची आवड पहिल्यापासूनच असल्याने, तिने मुंबईत येऊन आपले स्वप्न साकार करण्याचे ठरवले आणि आज तिने हे स्वप्न साकार केले आहे. शुभांगी अत्रे काही वर्षांपूर्वी या शोमध्ये सहभागी झाली होती. त्याआधी ही व्यक्तिरेखा शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) साकारत होती. त्यावेळी हे अवघड पात्र शुभांगी साकारू शकेल की नाही, असे वाटत होते. पण तिने स्वत:ला सिद्ध केले आणि आज अंगूरी भाभीच्या रूपात ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. (shubhangi atre education you will surprised)

एका दिवसाची घेते ‘इतकी’ फीस
ही प्रतिष्ठित व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शुभांगी अत्रेला शोमध्ये भरपूर फी मिळते. तिची एका एपिसोडची फी ४० ते ५० हजार रुपये आहे. ती जवळजवळ प्रत्येक एपिसोडमध्ये दिसते आणि अशा प्रकारे ती एका महिन्यात लाखोंची कमाई करते. शिवाय शुभांगी विवाहित आहे आणि तिला १४ वर्षांची मुलगी देखील आहे. शुभांगी तिच्या कुटुंबासह मुंबईत राहते आणि आनंदी जीवन जगते.

हेही नक्की वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा