Tuesday, January 27, 2026
Home कॅलेंडर नणंदेला भावजयीची ‘ही’ सवय काही आवडेना? अभिषेकच्या बहीणेने केला ऐश्वर्याबद्दल मोठा खुलासा

नणंदेला भावजयीची ‘ही’ सवय काही आवडेना? अभिषेकच्या बहीणेने केला ऐश्वर्याबद्दल मोठा खुलासा

बच्चन परिवार म्हणजे बॉलिवूडची शान आहे. बच्चन परिवारावर नेहमी कॅमेरांची नजर खिळलेली असते. संपूर्ण बच्चन कुटुंब मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. या परिवातील मुख्य सदस्य अमिताभ हे महानायक तर सून ऐश्वर्या विश्वसुंदरी आहे. याच कुटुंबातील एका सदस्य म्हणजे श्वेता बच्चन. अमिताभ यांची मुलगी ही जरी बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी अनेक कार्यक्रमात ती बच्चन परिवारासोबत दिसते.

श्वेता आणि ऐश्वर्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. मात्र तरीही श्वेताला या सौंदर्यवतीची एका सवय बिलकुल आवडत नाही. याबद्दल तिने एका कार्यक्रमात नुकताच खुलासा केला आहे. करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये श्वेता पोहचली असताना तिने ऐश्वर्याची तिला कोणती गोष्ट आवडत नाही हे तीने सांगितले.

श्वेताला ऎश्यर्या संबंधित प्रश्न विचारला गेला होता की, श्वेताला ऐश्वर्याची कोणती सवय बिलकुल आवडत नाही? यावर श्वेताने सांगितले की, “ऐश्वर्या खूप चांगली व्यक्ती आणि आई आहे. मात्र ऐश्वर्याला कधीही फोन किंवा मेसेज केला तरी ती लगेच कधीच उत्तर देत नाही. ती कामात असेल तेव्हा मी समजू शकते, मात्र ती घरी असली तरी कॉल मेसेजला रिप्लाय देत नाही. याचा मला कधी कधी खूप राग येतो.”

पुढे ती ऐश्वर्याची स्तुती करताना म्हणते,” ऐश्वर्या खूप आत्मविश्वासू आणि हुशार आहे. स्वकष्टावर तिने आज ती जिथे आहे ते स्थान मिळवले आहे. मी तिची खूप मोठी फॅन आहे.”

ऐश्वर्याने अभिषेक बच्चन सोबत लग्न केले असून त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने चित्रपटात काम करणे कमी केले. ‘फन्ने खां’ या सिनेमात ऐश्वर्या शेवटची दिसली. लवकरच ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या एका सिनेमात अभिषेक बच्चन सोबत दिसणार आहे. ऐश्वर्याने चित्रपटात काम करणे कमी केले असले तरी ती अनेक पुरस्कार सोहळे आणि इतर कार्यक्रमात नेहमी दिसत असते.

हे देखील वाचा