Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बीग बींच्या कन्येला अमिर खान का लिहीत होता पत्र, जाणून घ्या ‘ते’ कारण

बॉलिवूडचे शेहनशहा सुपरस्टार अमिताभ बच्चन हे हिंदी सिनेसृष्टीतले मोठे प्रस्थ आहे. अमिताभ बच्चन हे अभिनयसोबतच त्यांच्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अमिताभ हे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. सोशल मीडिया हा बिग बी आणि त्यांच्या फॅन्स मधला दुवा आहे. फक्त बिग बीच नाही, तर त्यांचं संपूर्ण कुटुंब नेहमीच लाइमलाइटमध्ये असतात.

नेहमीच अमिताभ यांच्या संपूर्ण परिवाराबद्दल आपण बोलतो, ऐकतो. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या मुलीबद्दल श्वेता बच्चन नंदा बद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. अमिताभ यांच्या संपूर्ण कुटुंबात सर्व सदस्य सुपरस्टार असल्याने साहजिकच त्यांच्यावर सर्वांच्या नजर खिळलेल्या असतात. अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा जरी अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय नसली तरी ती बॉलिवूडच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना, पार्ट्याना, अवॉर्ड्स फंक्शन्सला उपस्थित असते. शिवाय ती सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय आणि लोकप्रिय आहे.

श्वेता आणि अभिषेक ही बहीण-भावाची जोडी करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या कार्यक्रमात पोहचली होती. तिथे अभिषेकने श्वेताची अनेक गुपिते उघड केली. श्वेता बॉलिवूडमधल्या सलमान खान आणि आमिर खान या दोन सुपरस्टार्सची फार मोठी चाहती असल्याचे अभिषेकने यावेळी सांगितले.

श्वेताने जरी तिचे करियर चित्रपटांमध्ये केले नसले तरी तिला चित्रपट पाहण्याची खूप आवड आहे. श्वेता बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत असताना सलमान खानचा ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, तेव्हा तिने हा चित्रपट व्हीसीआरवर पाहिला.

एवढेच नाही तर तिच्या शाळेत चित्रपट पाहण्यास परवानगी नसल्याने तिने हा सिनेमा ऑडीओ कॅसेटमध्ये रेकॉर्ड करुन घेतला होता आणि ती कॅसेट ती नेहमी ऐकायची. इतकेच नाही तर तिने हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फ्रेंड लिहिलेली कॅप देखील अभिषेककडून मागवून घेतली होती.

सोबतच अभिषेकने श्वेता आमिरची खूप मोठी फॅन असल्याचे देखील सांगितले. जेव्हा आमिरला श्वेताच्या या क्रेझबद्दल समजले तेव्हा त्याने श्वेताच्या वाढदिवसाला तिच्यासाठी पत्र लिहायला सुरुवात केली होती. श्वेताने यावेळी सांगितले की, तिचा आणि आमिर खानचा वाढदिवस जवळ जवळच असतो. आमिरचा वाढदिवस १४ मार्चला असतो तर श्वेताचा वाढदिवस १७ मार्चला असतो.

हे देखील वाचा