Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

पलक तिवारीच्या ‘या’ मादक फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, नेटकरी झाले तिच्या लुक्सवर फिदा

आई-वडील दोघेही किंवा दोघांपैकी एका जण ज्या क्षेत्रात असतो, मुलं बहुतकरून तेच क्षेत्र करियरसाठी निवडतात. आता बॉलिवूडचेच उदाहरण घ्या. अनेक स्टारकिड्स आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच विविध इतर ठिकाणी नशीब अजमावत आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. श्वेताने तिच्या करियरमध्ये मालिकांच्या जोरावर अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. टीव्हीवरील आघाडीची अभिनेत्री अशी तिची ओळख होती. श्वेता अजूनही या क्षेत्रात कार्यरत आहे, मात्र आता तिची मुलगी असलेल्या पलक तिवारीने देखील या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

पलकने खूपच कमी वयात मोठी झेप घेतली आहे. अजून अभिनयात पदार्पण केले नसले तरी तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. केवळ म्युझिक व्हिडिओमध्ये काम करून पलकने तिच्या फॅन्स कमावले आहे. सुंदरतेसोबतच घायाळ करणाऱ्या अदा असणारी पलक सोशल मीडिया सेन्सेशन आहे. मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या पलकने नुकतेच तिच्या काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केला आहे. पलकने अजून तिची अभिनयाची चुणूक दाखवली नसली, तरी तिची स्टाइल आणि तिच्या लुक्स पाहून सर्वच तिच्या प्रेमात पडतात. पलकने पुन्हा एकदा तिच्या एथनिक लूक्समधले अतिशय सुंदर आणि हॉट फोटो शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Tiwari (@palaktiwarii)

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी आणि लाल रंगाचा लेहेंगा घातला असून, त्यावर तिने न्यूड मेकअप केला आहे तर केस मोकळे सोडले आहे. यावर तिने गळ्यात छोकरी सेट घातला आहे. तिसऱ्या फोटोमध्ये तिने डिपनेक असलेला मल्टीकलरचा लेहेंगा तर चौथ्या फोटोमध्ये तिने शरारा घातला आहे. यावर तिने केसांना वेव्ह टच दिला असून, कानात झुमके घातले आहे.

पलकच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती आतापर्यंत अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. लवकरच ती बॉलिवूडमध्ये देखील पाऊल टाकणार असून, तिचा ‘रोझी’ नावाचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. यासोबतच ती ‘किसी का भाई किसी जान’ मध्ये देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांच ‘मूड बना लिया’ गाण्याने घातलाय धुमाकूळ! पोस्ट शेअर करत म्हणाल्या, ‘जल्लोष संपण्याचं…,’
आदिलसोबत लग्नावर राखी सावंतने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मी खूप….’

हे देखील वाचा