सिनेमात आणि छोट्या पडद्यावर काम करून कलाकार प्रसिद्धी मिळवतात. याच कलाकारांची मुलंही त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत कलाविश्वात आपले पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक अभिनेत्री आहे, जिची मुलगीही आता सर्वांचे लक्ष वेधत आहे. तिचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या व्हिडिओवर चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत अनेकजण प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही तिच्या सुंदरतेमुळे नेहमीच चर्चेत असते. असे म्हणतात की, वय जसे वाढते, तसे चेहऱ्यावरील तेज कमी होते. मात्र, इथे जरा उलट आहे. वयाची चाळिशी पार करूनही अभिनेत्री श्वेताच्या सुंदरतेत वाढ होतच आहे.
असे असले, तरीही तिच्याप्रमाणे तिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) आपल्या शानदार अंदाजामुळे लाईमलाईटमध्ये आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तसेच, नेहमीच आपल्या सुंदरतेने सोशल मीडियावर चाहत्यांकडून वाहवा लुटते. आता तिचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पलक तिवारीने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ
नुकतेच पलकने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती क्रॉप टॉपमध्ये दिसत आहे. तसेच, ती डान्सही करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “त्यामुळेच मी कधी रील्स बनवत नाही.” तिने हा व्हिडिओ शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
अभिनेता जिब्रान खान याने कमेंट करत लिहिले की, “तुला माझे खरे एक्सप्रेशन्स माहिती आहेत.” तसेच, एका चाहत्याने कमेंट करत “गॉर्जियस,” असे लिहिले आहे. दुसऱ्या एका चाहत्याने तिला ‘बिजली’ असे म्हटले आहे. यावरून समजते की, तिचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे.
लवकरच दिसणार सलमान खानच्या सिनेमात?
माध्यमांतील वृत्तानुसार, पलक तिवारी लवकरच सिनेमातही आपला जलवा दाखवणार आहे. नुकतेच असे वृत्त आले होते की, ती सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ (Kabhi Eid Kabhi Diwali) या सिनेमाचाही भाग असणार आहे.
पलक तिवारी ही २१ वर्षांची असून इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे १.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-