टीव्ही क्वीन म्हटल्या जाणाऱ्या श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) छोट्या पडद्यावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘कसौटी जिंदगी की’ मधील प्रेरणा या व्यक्तिरेखेने ती रातोरात स्टार बनली. तिची ‘प्रेरणा’मधील भूमिका आजही लोकांच्या मनात आहे. याशिवाय तिने ‘परवरिश’, ‘बेगुसराय’ आणि ‘मेरे डॅड की दुल्हन’ यासारख्या मालिकाही गाजवल्या आहेत. आता लवकरच ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे.
श्वेता तिवारीचे टीव्ही इंडस्ट्रीत मोठे स्थान आहे यात शंका नाही. गेल्या काही वर्षांपासून ती टीव्हीपासून दूर होती, मात्र आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर अभिनय करून चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाली आहे. श्वेता तिवारी झी टीव्हीवरील मैं हूं अपराजिता या नवीन शोद्वारे टेलिव्हिजनवर परतत आहे. अलीकडेच, त्याचा प्रोमो व्हिडिओ देखील समोर आला, ज्यामध्ये श्वेताचा वेगळा अवतार दिसला. झी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून पोस्ट शेअर करताना असे लिहिले आहे की, “समाजातील समस्यांना तोंड देऊनही अपराजिता आपल्या मुलींसाठी ढाल बनून उभी आहे. त्यांना धैर्याने आणि विश्वासाने, प्रतिकूलतेशी लढायला शिकवते.
View this post on Instagram
या मालिकेत श्वेता तिवारी तीन मुलींच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा नवरा तिला सोडून गेला असून ती एकटीच तिच्या तीन मुलींची काळजी घेताना दिसणार आहे. समाज तिला खूप काही सांगेल, पण ती आपल्या मुलींना स्वतःची लढाई कशी लढायची हे शिकवेल.
याची झलक प्रोमो व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. जेव्हा श्वेता तिवारीच्या दोन मुलींना काही मुलांनी घेरले तेव्हा ते त्यांच्या आईला हाक मारतात. मग श्वेता तिवारी येते आणि म्हणते की असे बरेचदा होईल आणि त्यावेळी ती त्यांच्यासोबत नसेल. त्यांना स्वतःची लढाई लढायची आहे. मग तिन्ही बहिणी एकत्र येतात आणि पोरांना धडा शिकवतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा – शाहरुख खानच्या ‘वानर अस्त्र’ची झलक पाहून चाहते झाले बेभान, हनुमान बनून करणार आगीशी सामना
हिंदी भाषेच्या वादामुळे चर्चेत आलेला किच्चा सुदीप आहे सुपरस्टार, वाचा या दाक्षिणात्य अभिनेत्याचा प्रवास
जगभरातील मॉडेल्सला हरवून सिद्धार्थ शुक्ला ठरला होता ‘वर्ल्ड्स बेस्ट मॉडेल’ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय