×

हिंदी भाषेवरुन अजय देवगणसोबत वाद सुरु असणारा किच्चा सुदीप आहे सुपरस्टार, वाचा या दाक्षिणात्य अभिनेत्याचा प्रवास

अलीकडेच अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि कन्नड चित्रपट स्टार किच्चा सुदीप (Kichha Sudeep) यांच्यात हिंदी भाषेवरून वाद झाला. किच्चा सुदीपच्या वादग्रस्त विधानामुळे प्रकरण तापले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की हिंदी आता आपली राष्ट्रभाषा नाही कारण बॉलीवूड आता तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये डब करून पॅन इंडिया चित्रपट बनवत आहे. किच्चा सुदीपने हे विधान पॅन इंडियाच्या रिलीजवर आणि KGF च्या यशाबद्दल सांगितले होते. मात्र सुदीपच्या या वक्तव्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता. मात्र सध्या चर्चेत असलेल्या किच्चा सुदीपच्या अभिनय कारकिर्दीचा इतिहासही काही साधा नाही. कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशीच त्याची ओळख आहे. पाहूया किच्चा सुदीपच्या आयुष्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी.

View this post on Instagram

A post shared by KicchaSudeepa (@kichchasudeepa)

किच्चा सुदीपचे खरे नाव सुदीप संजीव आहे. लोक त्याला फक्त सुदीप नावानेच हाक मारतात. किच्चा सुदीप हा कन्नड चित्रपटांचा स्टार आहे. तो कन्नड सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आणि टीव्ही होस्ट देखील आहे. ४८ वर्षीय किच्चा सुदीपने कन्नड भाषेशिवाय तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. सलमान खानच्या ‘दबंग 3’, ‘फुंक’, ‘रन’, ‘फुंक 2’, ‘रक्तचरित्र 1’ आणि ‘रक्तचरित्र 2’ यासह बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये तो दिसला. किच्चा सुदीपचा जन्म कर्नाटकातील शिमोगा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव संजीव मंजप्पा आणि आईचे नाव सरोजा आहे. फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी किच्चा सुदीपला इंजिनियर व्हायचे होते. त्याने बंगळुरू येथून औद्योगिक आणि उत्पादनात अभियांत्रिकी पूर्ण केली. पण मनात अभिनेते होण्याची इच्छा होती. त्यामुळे तो मुंबईत आला आणि एका एक्टिंग स्कूलमध्ये दाखल झाला.

View this post on Instagram

A post shared by KicchaSudeepa (@kichchasudeepa)

किच्चा सुदीपने 1997 मध्ये कन्नड चित्रपट ‘थायव्वा’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. काही कन्नड चित्रपट केल्यानंतर, त्याने 2008 मध्ये राम गोपाल वर्माच्या फूंक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. किच्चा सुदीप 2 दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत आहे. त्याचा ‘विक्रांत राणा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 2001 मध्ये आलेल्या ‘हुच्छा’ या चित्रपटाने किच्चा सुदीपच्या करिअरमध्ये एक मोठे वळण आले. या चित्रपटाच्या यशाने त्याच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. या चित्रपटानंतर सुदीपला ‘किच्चा’ हे टोपणनाव मिळाले. यानंतर किच्चा सुदीपने एसएस राजामौली यांच्या ‘ईगा’ या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

View this post on Instagram

A post shared by KicchaSudeepa (@kichchasudeepa)

किच्चा सुदीप सलमान खानला आपला चांगला मित्र मानतो. ‘दबंग 3’ दरम्यान दोघांमध्ये खूप बॉन्डिंग होते. त्यादरम्यान किच्चा सलमानच्या ‘बिग बॉस’ शोमध्येही आला होता. किच्चा सुदीप स्वतःही ‘बिग बॉस कन्नड’ होस्ट करतो. किच्चा सुदीपने दबंग 3 साठी कोणतेही शुल्क घेतले नाही. म्हणजेच हा चित्रपट त्याने अगदी फुकटात केला. किच्चा सुदीपने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने ‘दबंग 3’ साठी एक रुपयाही घेतला नाही. सलमानचे कुटुंब त्याच्या कुटुंबाशी खूप जवळचे आहे. किच्चा म्हणाला होता की, तो जेव्हाही मुंबईला जातो तेव्हा सलमान आणि त्याचे कुटुंबीय त्याची पूर्ण काळजी घेतात. त्यानंतर सलमानने सुदीपला दीड कोटींची आलिशान कारही भेट दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post