Saturday, June 29, 2024

सना मकबूल अन् विशाल आदित्य सिंग ‘डिनर डेट’वर झाले स्पॉट; श्वेता तिवारी म्हणाली, ‘त्यांच्या पालकांना…’

‘खतरों के खिलाडी’च्या ११ व्या सीझनमध्ये अभिनेत्री सना मकबूल आणि अभिनेता विशाल आदित्य सिंग एकत्र दिसले होते. जेव्हापासून या दोघांना एकत्र डिनर डेटवर पाहिले आहे, तेव्हापासून हे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच हे दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते. जेथे पॅपराजींनी या दोघांना रात्रीच्या जेवणानंतर आपल्या कॅमेऱ्यात स्पॉट केले. या दरम्यान एका फोटोग्राफरने विशालला विचारले “लग्न कधी होणार आहे?” यावर उत्तर देताना विशाल म्हणाला की, “लग्न थोडीच होईल! निकाह होईल. मुलगी तर बघ, वेडा आहेस का.”

श्वेता तिवारीने दिली प्रतिक्रिया
‘खतरों के खिलाडी ११’ मध्ये विशाल आदित्य सिंगचे सर्वांशी खूप चांगले बॉन्ड होते. पण तो सर्वात जास्त तो श्वेता तिवारीच्या जवळ होता. अनेकदा शोच्या शूटिंग दरम्यान विशाल आदित्य सिंग आणि श्वेता तिवारीचे अनेक फोटो व्हायरल होत होते. त्याचबरोबर या शोमध्ये विशाल श्वेताला प्रेमाने आई म्हणत असे. अशा परिस्थितीत जेव्हा श्वेता तिवारी मीडियासमोर आली, तेव्हा तिला या दोघांच्या डिनर डेटबद्दल विचारण्यात आले. या दोघांच्या जेवणाच्या डिनर डेटला श्वेताने एक मजेदार उत्तर दिले. (Shweta Tiwari reacts to the dinner date of actress Satrana Maqbool and Vishal Aditya Singh)

‘ही आजकालची मुले आहेत’
श्वेता आणि विशाल यांच्यात चांगला बॉन्ड तयार झालेला आहे. श्वेता तिवारी त्यांच्या डिनर डेटबद्दल उत्तर देत म्हणाली की, “काय बोलू? जर त्याला मुलगी मिळाली तर मिळाली.” त्याचबरोबर ती पुढे म्हणाली की, “आजकालची मुलं त्यांच्या पालकांना विचारून काहीही करत नाहीत.” यापूर्वी विशाल आदित्य सिंगने सनासोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यावर निक्की तांबोळीने प्रतिक्रिया देत लिहिले होते की, ‘लव इज इन द एयर.’

‘खतरों के खिलाडी’मधून झाला बाहेर
‘खतरों के खिलाडी’तून बाहेर आल्यानंतर विशाल आदित्य सिंगने एक्स गर्लफ्रेंड मधुरिमा तुलीच्या रागालाही प्रतिसाद दिला. विशाल आदित्य सिंगने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “जेव्हा ती घटना घडली, तेव्हा मलाही फार आनंद झाला नाही. जिथे तिने रिक्रिएशन केली. पण त्यावेळी तिथे दोन मोठी माणसे होती, तुम्ही समजू शकता मोठे लोक म्हणजे कोण असू शकतात. तिथे ते म्हणाले, तू मूर्ख आहेस का? सोड तू ‘खतरों के खिलाडी’ आहेस हे महत्वाचे आहे. हे असेच घडत राहील. हे फक्त एक स्वरूप आहे. ते म्हणाले की, हे असेच ठेव आणि संपव.”

मधुरिमा तुलीला दिला सल्ला
विशाल आदित्य सिंगने आपले मत व्यक्त करत मधुरिमा तुलीला एक सल्ला दिला. तो म्हणाला, “मी फ्रायपॅन घटनेला जास्त महत्त्व दिले नाही आणि हेच कारण होते की मी पुन्हा शोमध्ये विषय काढला नाही. या गोष्टीचा स्वीकार कर आणि पुढे जा.”

विशाल आदित्य सिंग आणि मधुरिमा तुली एकमेकांना २०१७ पासून डेट करत होते. त्यांचे हे नात २०१८ पर्यंतच टिकून राहू शकले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा