Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड जामीन मिळाल्यानंतर नोंदवला सिद्धांत कपूरचा जबाब; अभिनेता म्हणाला, ‘बंगळुरू पोलीस लोकांना…’

जामीन मिळाल्यानंतर नोंदवला सिद्धांत कपूरचा जबाब; अभिनेता म्हणाला, ‘बंगळुरू पोलीस लोकांना…’

श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूर (Siddhant Kapoor) याला सोमवारी (१३ जून) बेंगळुरू येथून अंमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आली. रविवारी (१२ जून) रात्री उशिरा रेव्ह पार्टीमध्ये अंमली पदार्थ घेतल्याप्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. छाप्यादरम्यान शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांच्या मुलासह अन्य चार जणांनाही अटक करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी (१४ जून) सिद्धांतसह सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मंगळवारी अभिनेत्याला पोलिसांसमोर जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्यात आले. चौकशीत त्याने सांगितले की, त्याला कोणीतरी दारू आणि अंमली पदार्थांसह सिगारेट दिली होती. याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसल्याचे अभिनेत्याने सांगितले.

मंगळवारी जामिनानंतर, सिद्धांतने एका निवेदनात प्रथमच त्याच्या अटकेबद्दल सांगितले. तपासात सहकार्य करत असल्याचे सांगत अधिकृत निवेदनात तो म्हणाला, “मी हॉटेलमध्ये होतो आणि चौकशी सुरू होती. तपासात मी सहकार्य करत राहीन. बंगळुरू पोलीस खरोखरच लोकांचे जीव वाचवण्याचे चांगले काम करत आहेत.” (siddhanth kapoor defends himself to police)

यासंदर्भात डीसीपी भीमाशंकर गुलेद यांनी सांगितले की, सिद्धांतचा दावा आहे की, त्याच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले होते आणि त्याला याची माहिती नव्हती. डीजे म्हणून त्यांनी अनेकवेळा पार्ट्यांमध्ये हजेरी लावली आहे. या संदर्भात डीसीपी म्हणाले की, त्याच्याकडे पाहुण्यांची यादी मिळाली आहे. पोलिसांना जो कोणी संशयास्पद वाटेल, त्याला चौकशीसाठी बोलावले जाईल. सिद्धांतसोबतच पोलिसांनी इतर चार जणांचेही मोबाईल जप्त केले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सिद्धांतचे वकील प्रवीण मुगली यांनीही या प्रकरणी निवेदन जारी केले. ते म्हणाले, “जेव्हा जेव्हा विचारले जाईल तेव्हा तो बंगळुरूला जाईल आणि पोलिसांना सहकार्य करेल.” बुधवारी (१५ जून) सकाळी सिद्धांतने फ्लाइटचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो फ्लाइटमध्ये चढताना दिसला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोतून तो चाहत्यांना इशारा देत होता की, तो मुंबईला परत जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा