Thursday, July 31, 2025
Home अन्य ‘अब हमारी पर्मनंट बुकिंग हो गयी है’, म्हणत कियाराने शेअर केले लग्नाचे फोटो; एकदा पाहाच

‘अब हमारी पर्मनंट बुकिंग हो गयी है’, म्हणत कियाराने शेअर केले लग्नाचे फोटो; एकदा पाहाच

बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या आयुष्यात तो क्षण आला आहे, ज्याची दोघेही आतुरतेने वाट पाहत होते. (दि, 7 फेब्रुवारी) रोजी हे कपल विवाह बंधनात अडकलं आहे. या कपलचा शाही विवाह सोहळा जैसलमेरच्या सूर्यगढ़ पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला आहे. त्यावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. त्याशिवाय मुकेश अंबानीची मुलगी इशा अंबानी हिनेही शाही थाटमाटता हजेरी लावली होती.

शेरशाह कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या काही दिवसांपासून यांच्य लग्नाच्या अनेक चर्चा सुरु होत्या त्यामुळे चाहत्यांनीही कामलीची उत्सुकता लागली होती. अशातच नुकतंच हे कपल पारंपारिक पद्धतीने विवाह बंधनात अडकलं आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्नामध्ये कियाराने भरीव लेहंगा परिधान केला होता ज्याने प्रत्यकालाच आकर्षित केलं होतं. त्यासोबतच सिद्धार्थनेही लेहंग्याला मॅचिंग असा आउटफीट परिधान केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

सिद्धार्थ-कियाराचं लग्नाचा थाटच वेगळा होता. लग्नापूर्वीचे कार्यक्रम आणि सुर्यगड पॅलेसच्या सजावटीच्या फोटोंनी तर सोशल मीडियावर क्रेजच केली आहे. या लग्नसोहळ्यामध्ये मोजक्याच पाहुणे मंडळीला आमंत्रित करण्यात आले होते त्यामुळे लग्नानंतर सूर्यगड पॅलेसमध्ये मोठी पार्टी होणार आहे. त्याचबरोबर  दिल्लीत रिसेप्शनही ठेवण्यात आले आहे. दिल्लीतील रिसेप्शननंतर सिद्धार्थ आणि कियारा 10 फेब्रुवारीला मुंबईत पोहोचतील. यानंतर 12 फेब्रुवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये सिने जगतातील सर्व दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत.(bollywood actor sidharth malhotra father not well kiara advani wedding latest update baraat band baja ready saat phere will take place at 3pm)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अय्याे! अर्जुन कपूरने चक्क व्हिडिओ शेअर करून अभिनेत्रीला म्हटलं, ‘झुटी और मक्कार’
रितेश-जिनेलियाच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, आठवणींना उजाळा देत शेअर केला लग्नाचा व्हिडिओ

हे देखील वाचा