या मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार येतात आणि जातात. मात्र असे मोजकेच कलाकार आहेत ज्यांना इथे यश मिळते. काही कलाकार त्यांच्या मेहनतीने या क्षेत्रात पहिले काम तर नक्क्कीच मिळवता, पण कधी कधी दुर्दैवाने त्यांना त्यानंतर पुन्हा संधी मिळत नाही. मात्र बऱ्याचदा असे म्हटले जाते की, नशीब सर्वांना दुसरी संधी नेहमी देते. आपल्याला फक्त ती संधी ओळखता आली पाहिजे. प्रत्येक गोष्टींमध्ये जसे अपवाद असतात, तसेच अपवाद या गोष्टींना देखील आहेतच. अशीच दुसरी किंबहुना तिसरी संधी सुद्धा मिळालेली अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी.
कियाराने (kiara aadwani) २०१४ साली ‘फगली’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. हा सिनेमा जोरदार आपटला आणि त्यानंतर कियाराला काम मिळेनासे झाले. मात्र नशिबाने तिला महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि कियाराने ही संधी हेरली. कियाराने या क्षेत्रात येण्यासाठी आणि इथे येऊन टिकण्यासाठी तिने खूप संघर्ष केला आहे. आज कियारा तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी.

कियाराचा जन्म ३१ जुलै १९९२ रोजी मुंबईमध्ये झाला. कियाराचे वडील जगदीप आडवाणी हे मोठे व्यावसायिक आहेत. तर आई जेनिफर या ख्रिश्चन आहेत. कियाराचे खरे नाव आलिया आडवाणी असे आहे. मात्र फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी तिने तिचे नाव कियारा अडवाणी केले. सिनेसृष्टीमध्ये आधीच आलिया भट्ट नावाची अभिनेत्री असल्याने तिने तिचे नाव बदलले. प्रियांका आणि रणबीर कपूर यांच्या ‘अंजाना अंजानी’ सिनेमात प्रियांकाचे नाव कियारा होते, म्हणूनच तिने तिचे नाव कियारा ठेवले. (
कियाराबद्दल ही माहिती जास्त कोणाला माहित नसेल, की कियाराचे बरेच नातेवाईक हे सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार आहे. मॉडेलिंगमध्ये यशस्वी असणारी शाहीन जाफरी ही कियाराची मावशी आहे. शाहीन ही दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांची नात आहे. एकेकाळी शाहीन आणि सलमान यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. शिवाय कियारा जुही चावलाची भाची देखील आहे.
कियाराने जरी २०१४ साली पदार्पण केले असले, तरी तिला खरी ओळख ही २०१६ मध्ये आलेल्या नीरज पांडे यांच्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमातून मिळाली. या चित्रपटात तिने धोनीच्या पत्नीची साक्षीची भूमिका साकारली होती. २०१९ साली आलेल्या ‘कबीर सिंग’ सिनेमाने तिला प्रसिद्धीच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. या सिनेमात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.
कियाराने खूपच कमी काळात बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे. आज कियाराची गणती यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. कियाराने ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसिरीजमध्ये काम केले. या सिरीजमधील तिचा एक सीन खूपच गाजला होता. अजून एक खास बाब म्हणजे, कियारा ही सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानीची खास मैत्रीण आहे. कियाराने तिच्या करियरमध्ये हिंदीसोबतच तामिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.
तिच्या चित्रपटांच्या लिस्टमध्ये ‘गुडन्यूज’, ‘गिलटी’, ‘इंदू की जवानी’, ‘लक्ष्मी’, ‘मशीन’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कियारा सध्या सिद्धार्थला डेट करत असल्याच्या बातम्या आहेत.
अधिक वाचा-
–काय सांगता! राजेश खन्ना अन् मुमताज यांच्या ‘या’ सिनेमातील क्लायमॅक्स सीनच्या चित्रीकरणासाठी लागले होते आठ दिवस
–काय सांगता! संजय दत्तचे होते 308 अफेअर; अभिनेता झाला होता ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा