एखाद्या मुलावर जीवापाड प्रेम करायचं, त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची, त्याच्या प्रत्येक आवडीनिवडी समजून घ्यायच्या, संपूर्ण आयुष्य त्या मुलाबरोबर जगण्याची स्वप्ने बघायची आणि एक दिवस तोच मुलगा आपल्याला एकटं सोडून या जगाचा निरोप घेतो. बऱ्याचशा चित्रपटांमध्ये अशा प्रकारच्या कथा दाखवल्या जातात. परंतु हे सर्वकाही शहनाझ स्वतः अनुभवत आहे. गुरुवारी सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले. शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या सर्वांमध्ये त्याची जिवाभावाची मैत्रीण शहनाझ पूर्णपणे खचून गेली आहे.
सिद्धार्थाच्या प्रेमात होती शहनाझ गिल
‘बिग बॉस १३’ मध्ये शहनाज आणि सिद्धार्थची चांगलीच मैत्री जमली होती. ते दोघे तिथे एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत होते. शहनाझ सिद्धार्थवर किती प्रेम करत होती, हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. शहनाझ त्याच्यावरील प्रेमाबद्दल नेहमी सांगायची, तर दुसरीकडे सिद्धार्थ माध्यमांसमोर ती त्याची एक खूप चांगली आणि खूप जवळची मैत्रीण आहे असे सांगायचा. प्रेक्षकांना या दोघांची जोडी खूप आवडायची. त्यांच्या चाहत्यांनी या जोडीला ‘सिडनाझ’ असे नाव देखील दिले होते. शहनाझ सिद्धार्थच्या प्रेमात पूर्ण बुडून गेली होती. तिला कुठे माहित होते की, तिच्या सुखाला असे विरझन लागणार आहे. (Siddharth and shehnaz planning to to marry in December 2021 family book hotel)
२०२१ मध्ये करणार होते लग्न
शहनाज प्रमाणेच सिद्धार्थ देखील तिच्यावर प्रेम करत होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे हे नाते पुढे नेण्याचा विचार केला होता. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, ते दोघे २०२१ मध्ये लग्न करणार होते. दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या नात्याला सहमती दिली होती. दोन्ही कुटुंबीयांमध्ये त्यांच्या लग्नासाठी कोणते हॉटेल निवडायचे, किती पाहुणे बोलवायचे, लग्नाचे डेकोरेशन या सर्व गोष्टी ठरवण्याचे काम सध्या सुरु होते. दोघांच्याही कुटुंबीयांना या लग्नामध्ये खूप धमाल करायची होती.
शहनाझने अबू मलिककडे मागितली होती मदत
अबू मलिकने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार, शहनाझने त्याला त्यांच्या लग्नाविषयी सिद्धार्थ बरोबर बोलायला सांगितले होते. मुलाखतीमध्ये अबू मलिक म्हणाला की, “शहनाझ खूप खचून गेली आहे. तिला सिद्धार्थसोबत लग्न करायचे होते. त्या दोघांच्या लग्नाविषयी मी सिद्धार्थला विचारावे, असे तिने मला सांगितले होते. ही गोष्ट साधारण लॉकडाउन लागण्याच्या एक दिवस आधीची आहे. तिने मला २२ मार्च २०२० ला हे सांगितले होते. सिद्धार्थ देखील तिच्यावर खूप प्रेम करायचा. तो म्हणायचा शहनाझ माझ्यावर नाराज असली, तर माझा तो दिवस चांगला नाही जात.”
सिद्धार्थसाठी शहनाझ देवाकडे खूप प्रार्थना करायची. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने या गोष्टीचा खुलासा केला होता. शहनाझ म्हणाली होती की, “मी माझ्या आणि सिद्धार्थच्या नात्यासाठी देवाकडे रोज प्रार्थना करते, कदाचित आम्ही दोघे कधी तरी एक होऊ. आम्ही एकमेकांना खूप काही शिकवलं आहे. आमचं प्रेम खरं आहे. त्यामुळेच सर्वाना आमची जोडी खूप आवडते.”
सिद्धार्थच्या मृत्यूने शहनाझच्या डोळ्यासमोर पूर्णतः अंधार पसरला आहे. सिद्धार्थ अशा पद्धतीने सोडून जाईल याची तिला देखील काहीच कल्पना नव्हती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…