आज आपण २०२०च्या शेवटच्या दिवसावर येऊन थांबलो आहोत, उद्यापासुन नवीन वर्ष, नवीन दिवस सुरु होणार आहे. २०२० हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच खूप त्रासदायक ठरले. मात्र आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात होणार आहे. यानवीन वर्षात २०२० च्या कटू आठवणींना विसरून सर्व जणं नवीन आनंददायी सुरुवात करणार आहे. मराठी सिनेक्षेत्रात देखील नवीन वर्ष खूप आनंदात जाणार आहे. अनेक मराठी कलाकारांची लग्नं यावर्षत होणार आहे. मानसी नाईक पासून अभिज्ञा भावे यांच्यापर्यंत अनेक कलाकार यावर्षी बोहल्यावर चढणार आहेत. यातलीच एक गोड आणि क्युट जोडी म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर.
तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणारे सिद्धार्थ आणि मिताली लवकरच लग्न करणार आहेत. २०१९ साली त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आता सिद्धार्थ आणि मितालीने लग्न होणार असल्याने त्यांचे लग्नाआधीचे सर्व कार्यक्रम सुरु झाले आहेत.
https://www.instagram.com/p/CJWPyUgJIiN/
सध्या सिद्धार्थ आणि मिताली केळवणांचा आस्वाद घेत आहेत. त्यांचे विविध ठिकाणी केळवण सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी ईशा केसकरच्या घरी त्यांचे पहिले केळवण झाले. आता त्यांच्या कुटुंबियांसोबत त्यांचे केळवण पार पडत आहे. या सर्व केळवणांचे फोटो मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. अतिशय पारंपरिक वेशभूषा करून ही दोघे केळवणांसाठी गेल्याचे दिसत आहे.
आपल्या महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये केळवण हा लग्नाचा एक भागच असतो. लग्नाआधी वधू-वरांसाठी केले जाणारे केळवण हे सगळ्यांनी एकत्र भेटण्याचं निमित्त असते. वधू-वरांच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना जेवणासाठी पाहुण्यांकडे आमंत्रित केले जाते. त्यानंतर एखादी भेटवस्तू देऊन लग्नाच्या शुभेच्छा दिल्या जातात. लग्नाच्या आधी केळवण ही आपली खूप जुनी पारंपरिक प्रथा आहे.
अदयाप सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाची तारीख समोर आली नसली तरी ते २०२१ मध्ये लगीनगाठ बांधणार हे नक्की. सध्या मिताली तिच्या झी मराठीवरील ‘लाडाची मी लेक गं’ मालिकेत व्यस्त आहे.