अखेर विकेट पडली! अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा संपन्न; पाहा फोटो

अखेर विकेट पडली! अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा संपन्न; पाहा फोटो


मराठी चित्रपट विश्वातील एक हसतमुख अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि तितकीच हसऱ्या चेहऱ्याची मिताली मयेकर यांचा लग्न सोहळा आज संपन्न झाला. जवळचे मित्रमंडळी आणि परिवारातील सदस्य यांच्या उपस्थित ते दोघेही आज लग्नबंधनात अडकले आहेत.

पुण्यामध्ये हा विवाह सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला. या विवाहाच्या फोटोंची त्यांच्या चाहत्यासह सर्वांनाच उत्सुकता होती.

सिद्धार्थने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नसोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती.

नाकात नथ, हातात हिरवा चुळा,माथ्यावर बाशिंग असा तिचा लूक होता. तर सिद्धार्थ जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते.

या लग्नसोहळ्याला अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान अशा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.