[rank_math_breadcrumb]

बॉलिवूडला रामराम ठोकत प्रदीप रावत साऊथमध्ये झाले सुपरहिट; म्हणाले, या कारणासाठी ठोकला होता रामराम

गजनी आणि लगान या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करुन आपली ओळख निर्माण करणारे जेष्ट अभिनेते प्रदिप रावत यांचे निधन झाले आहे. कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर ते 4 ऑगस्ट 2026 रोजी त्यांचे निधन झाले आहे. ते आता 74 वर्षाचे होते. त्याच्या जाण्याने चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि त्यांच्ये चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. प्रदिप रावत यांचे या चित्रपटसृष्टीसाठी योगदान खुप होते. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटासाठी काम केले आहे. आणि विशेष करुन ते त्याच्या खलनायक  भुमिकेतुन सर्वाना आश्चर्य करत होते. तर त्याच्या निधनाने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही शोककळा पसरली आहे. 

प्रदिप रावत (rawat)यांना दाक्षिणात्य चित्रपटामध्ये खलनायकांच्या भुमिकेसाठी जास्त प्रसिध्दी मिळाली आहे. त्यानी ‘भद्रा’ आणि ‘रेबेल’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक पुरस्कार मिळवले. तसेच निर्माते एस. एस. राजामौली यांच्या २००४ सालच्या ‘सई’ या चित्रपटातील ‘भिक्षू यादव’ या भूमिकेसाठी त्याला पुरस्कार मिळाला. आणि त्या नंतर त्यांना अमिर खानच्या गजनी चित्रपटात खलनायकाची भुमिका मिळाली. आणि तो चित्रपट भुरपुर प्रमाणात हिट ठरला.

प्रदीप रावत यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, दाक्षिणात्य चित्रपटात कलाकारांना बॉलिवूडपेक्षा खूप जास्त मानधन मिळते. आजकाल कलाकार मुंबईपेक्षा दाक्षिणेत जास्त काम करतात. जर तुम्हाला मुंबईत एखाद्या प्रोजेक्टसाठी १०० रुपये मिळत असतील, तर दक्षिणेत 300 रुपये मिळतात. आणि एक गोष्ट तुमच्या कामाच्या मानधनसाठी तिथे विचारवे लागत नाहित. मात्र बॉलिवूड मध्ये काम करताना विचाराव लागत.

वृत्तानुसार, प्रदीप रावत यांचे मॅनेजर, सिद्धार्थ आर. तिवारी यांनी अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, अभिनेते गेल्या जवळपास पाच वर्षांपासून रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत होते.

हेही वाचा

‘अश्लील विनोद खपवून घेतले जाणार नाहीत’; उदयनिधीच्या त्रिशावरील वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया