Wednesday, July 17, 2024

सिद्धार्थ मितालीची परदेशवारी ! इटलीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री मिताली मयेकर हे आपल्याला नेहमीच इंटरनॅशनल ट्रिप करताना दिसत असतात. आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या देशांना भेट दिलेली आहे. आणि तेथील ट्रीपचे फोटो देखील ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच आता सिद्धार्थ आणि मिताली हे इटलीच्या दौऱ्यावर आहेत. तेथील त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये मिताली आणि सिद्धार्थ इटलीच्या निसर्गाचे दर्शन घेताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे इटलीतील खाद्य संस्कृती देखील त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवरून दाखवलेली आहे. त्यांच्या चाहत्यांसोबत मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत.

या आधी एका मुलाखतीत सिद्धार्थला जेव्हा त्याच्या त्यांच्या इंटरनॅशनल ट्रिप्स बाबत विचारले. तेव्हा तो म्हणाला की, “आम्ही दोघेही मिळून जगाच्या नकाशावरील एका देशावर बोट ठेवतो आणि त्या देशात जाण्यासाठी आम्ही पैसे जमा करतो. हे पैसे आम्ही दोघेही जमा करतो. आणि पूर्ण तयारी झाल्यावर आम्ही त्या ठिकाणाला भेट देतो.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘बॅड न्यूज’चे पहिले गाणे ‘तौबा तौबा’ रिलीज, विकी-तृप्तीच्या केमिस्ट्रीने लावली आग
अंबानी कुटुंबाने केले सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन; सोने चंदीसह नवदाम्पत्याला दिले 1 लाख रुपये भेट

हे देखील वाचा