Friday, July 5, 2024

‘माझ्या सर्वस्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा’, म्हणत सिद्धार्थने पत्नी मितालीला केले विश

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका, जिने अगदी कमी कालावधीत तिचे नावलौकिक मिळवले आहे, ती अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर होय. मितालीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनात तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. चित्रपटांसोबत ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे चाहते तिच्याबाबत जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. शुक्रवारी (११ सप्टेंबर) मिताली २६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त तिचा पती सिद्धार्थ चांदेकर याने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा आणि मितालीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मिताली सिद्धार्थच्या कवेत झोपलेली दिसत आहे. या फोटोमध्ये त्या दोघांमधील केमिस्ट्री दिसून येत आहे. (siddharth chandekar give wishesh to mitali mayekar on her birthday)

हा फोटो शेअर करून सिद्धार्थने कॅप्शन दिले आहे की, “माझ्या सर्वस्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू आणि मी आता एकाच क्लबमध्ये आहोत.” यासोबत त्याने टायनी पांडा आणि मंकी असे लिहिले आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोवर मिताली मयेकरने “आय लव्ह यू,” अशी कमेंट केली आहे. अभिनेत्री मधुरा देशपांडे हिने कमेंट केली आहे की, “आई गं किती गोड असावं ना काही माणसांनी. हॅप्पी बर्थडे गोंडस मुलगी.” यासोबत प्रसाद ओक, स्पृहा जोशी, आदिनाथ कोठारे, प्रार्थना बेहेरे, ईशा केसकर यांसारख्या अनेक कलाकारांनी या फोटोवर कमेंट करून मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थ आणि मिताली हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपे आहे. ते दोघे गेल्या चार वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. यावर्षी २४ जानेवारीला त्यांनी लग्न केले आहे. त्यांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

मितालीच्या‌ कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकर’, ‘घेतला वसा टाकू नको’, ‘लाडाची मी लेक गं’ या चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुख खानने लाँच केले रितेश अन् जिनिलियाचे ‘प्लांट बेस्ड मीट व्हेंचर’, मजेशीर ट्वीट चर्चेत

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा