सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय यांच्या लग्नापूर्वीचा सोहळा ५ फेब्रुवारी रोजी मुंबईत मोठ्या थाटामाटात सुरू झाला. हळदी, मेहंदी आणि कॉकटेल समारंभांना कुटुंब, मित्र आणि नातेवाईक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. या निमित्ताने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यामध्ये प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि मनारा चोप्रा यांचे फोटो देखील आहेत, जे सोशल मीडियावर खूप लक्ष वेधून घेत आहेत. दोघेही एका ग्रुप फोटोमध्ये त्यांच्या मेहंदी डिझाइन्स दाखवताना दिसत आहेत. या खास प्रसंगी पारंपारिक कपडे घालून प्रियांका आणि मनारा चोप्रा यांनी त्यांच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मेहंदी समारंभात दोन्ही चोप्रा बहिणी खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होत्या. या कार्यक्रमात तिने तिच्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवले.
मनाराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये ती विधींचा पुरेपूर आनंद घेताना दिसते. एका व्हिडिओमध्ये ती तिच्या हातांवर मेहंदी लावताना दिसत आहे. तर, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ती प्रियांका चोप्रासोबत नाचताना दिसत आहे.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मनारा सध्या ‘लाफ्टर शेफ्स’ नावाच्या शोमध्ये दिसत आहे. याआधी ती बिग बॉसमध्येही दिसली आहे. ती शोच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
निळ्या रंगाच्या साडीत खुलले तेजश्री प्रधानचे सौंदर्य; पाहा फोटोस
अंगद बेदी वारसा मिळालेले क्रिकेट सोडून बॉलिवूडमध्ये का आला? जाणून घ्या संपूर्ण कहाणी