Thursday, July 18, 2024

‘बिग बॉस’ विनर तेजस्वी प्रकाश करतेय मराठी चित्रपटात पदार्पण, बॉयफ्रेंडनेही मराठीतच केले कौतुक…

लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिने आपल्या दमदार अभिनयाने छोट्या पडद्यावर वेगळेच स्थान मिर्माण केले आहे. बिग बॉस कार्यक्रमाची ट्रॉफी पटकवल्यापासून ती अजूनच प्रसिद्ध झाली आहे. करण कुंद्रा सोबत एसलेल्या नात्यामुळे ही जोडी नेहमी चर्चेत असते. मात्र, तेजस्वी पुन्हा एकदा खूपच चर्चत आली आहे करण ती मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करत असून तिच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर देखिल प्रदर्शित झाला आहे.

आपण नेहमी पाहतो की, मराठी कलाकार हिंदी चित्रपटाचाकडे धाव घेताना दिसून येत आहेत मात्र, यावेळेस जरा वेगळेट घडले आहे. ‘बिग बॉस’ विनर तेजस्वी प्रकाश (Tejashwi Prakash) या अभिनेत्रीने ‘मन कस्तुरी रे‘ या चित्रपटातून मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पदर्पण केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर (दि. 22 ऑक्टोंबर) दिवशी प्रदर्शित झाला असून याच्या लॉंच पार्टीमध्ये तेजस्वी प्रकाशचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा यानेही हजेरी लावली होती. तेजस्वीने हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले होते. मात्र, बिग बॉस जिंगकल्यानंतर तीला अजूनच प्रसिद्ध मिळाली असून तिला एक चांगला जोडीरही लाभला.

या चित्रपटामध्य तेजस्वी आणि अभिनय बेर्डे हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित सोहळा पार पडला. त्यावेळी तेजस्वी आणि अभिनय या दोघांनी स्कुटीवरुन धमाकेदार एन्ट्री केली होती. त्यामुळे सर्वत्र या चित्रपटाच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर तेजस्वीचे मराठी भाषेतील चित्रपटामुळे खूपच कौतुक होत आहे. या चित्रपटामध्ये अभिनय सिद्धांत नावाची भूमिका करत असून तेजस्वी श्रुती नावाची भूमिका साकारत आहे. यामध्ये घर चालवण्यासाठी नोकरी करणाऱ्या सिद्धांतच्या आयुष्यातमध्ये जेव्हा श्रुतीची एन्ट्री होते त्यांनतर नेमकं गाय घडतं एवढा चांगला काम करणारा मुलगा अचानक कोठडीत जातो हे या चित्रपटामध्ये दाखवले आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तेजस्वीची भुमिका सगळ्यांनाच खूप आवडली आहे. सोबतच तेजस्वीला एवढे चांगले मराठी बलेताना पाहून चाहते खूपच खूश झाले आहेत. तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा येनेही तिचे तोंडभरुन कौतुक केले आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर पाहून करणनेही मराठीमध्ये आपला प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाला की, “ट्रेलर खूप छान वाटला.” करणला मराठीमध्ये बोलताणा एकूण तेजस्वी खूपच खुश झाली होती. तसंच त्याने प्रेक्षकांना चित्रपट आवर्जु पाहण्याचेही आवाहन केले. मन कस्तुरीरे हा चित्रपट 4 नोव्हेंबर दिवशी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अब्दू रोजिकचा शत्रू हसबुल्ला येणार बिग बॉसमध्ये, लवकरच होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री
बाहुबली सिनेमातील प्रभासचा रोल मिळाला होता ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला, भूमिका करण्यास नकार देत…

हे देखील वाचा