Wednesday, December 18, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

मराठी चित्रपटसृष्टीत सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर सर्वत्र आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव होय. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्याचे चाहते पसरलेले आहेत. आपल्या विनोदी स्वभावाने त्याने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेक चित्रपटात आणि नाटकांमध्ये त्याने काम करून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सिद्धार्थ चित्रपटासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांवर शेअर करत असतो. सिद्धू त्याच्या कुटुंबासोबत देखील अनेकवेळा फोटो शेअर करत असतो. बुधवारी (१ सप्टेंबर) सिद्धार्थ आपल्या आईचा वाढदिवस साजरा आहे. त्यानिमित्त त्याने त्याच्या आईसोबत फोटो शेअर करून एक पोस्टही लिहिली आहे.

सिद्धार्थने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या आईसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सिद्धार्थने एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या आईसोबत खूप खुश दिसत आहे. हा फोटो शेअर करून त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सौ. मंदाकिनी रामचंद्र जाधव. आये… तुझं हसणं, हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई आणि ही कमाई कमवण्यासाठी आयुष्यभर राबायची तयारी आहे माझी. लव्ह यू आये. हॅप्पी बर्थडे ओ मा.”

सिद्धूने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून त्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “एक नंबर सिद्धू, आईपेक्षा काहीच मोठं नाही, आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.” त्याचे अनेक चाहते हा फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (siddharth jadhav give best wishesh to his mother on her birthday)

https://www.facebook.com/100044357049699/posts/389980219157210/

सिद्धार्थच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर २००४ साली आलेल्या ‘अगं बाई अरेच्छा!’ हा त्याचा पहिलाच सिनेमा होता. यानंतर त्याने ‘जत्रा’, ‘जबरदस्त’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘गलगले निघाले’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘हुप्पा हुय्या’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कुटुंब’, ‘फास्टर फेने’, ‘जत्रा’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘दे धक्का’, ‘हुप्पा हुय्या’, ‘टाईम प्लीज’, ‘धुरळा’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्याला बॉलिवूडमधूनही ऑफर आल्या. त्याने ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘राधे’ आणि ‘सिंबा’ या हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

-खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

-बॉलिवूडच्या ‘अशा’ जोड्या जे एकमेकांपासून राहतात वेगवेगळे, पण अजूनही घेतला नाही घटस्फोट

हे देखील वाचा