आयुष्य बदलवणाऱ्या स्वप्नांची उमेद बाळगणाऱ्या ‘ती’ची कहाणी आता लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ खिरीद आणि संचिता कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘राणी मी होणार’ या मालिकेचा प्रोमो झळकला असून हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रोमोमध्ये सिद्धार्थ आणि संचिता एका पार्लरमध्ये काम करताना दिसत आहेत.
‘राणी मी होणार’ (Rani Me Honar series )ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेतील कलाकारांनी एक ॲक्टिंव्हिटी मीडियासोबत केली. त्यांनी खऱ्याखुऱ्या पार्लरमध्ये जाऊन एक्सपर्ट्सच्या मदतीने पत्रकार मंडळींचे, कस्टमर्सचे ग्रुमिंग केले. नेलआर्ट, आय मेकअप, हेअर स्टाईल अशा सलोन सर्व्हिस त्यांनी दिल्या. या व्यतिरिक्त त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, त्यांचे ब्युटी, मेकअप सिक्रेटस् शेअर केले. यानिमित्ताने कलाकारांनीही खऱ्या पार्लरमध्ये सर्व्हिस देण्याचा अनुभव घेतला.
‘राणी मी होणार’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांची मालिकेविषयीची उत्सुकता वाढली आहे. येत्या 21 ऑगस्टपासून सोनी मराठीवर रात्री आठ वाजता ‘राणी मी होणार’ ही नवी मालिका सुरु होत असून ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार पाहाता येणार आहे. सिद्धार्थने जाडुबाई जोरात, फ्रेशर्स , एक होती राजकन्या, मुलगी झाली हो, हृदयी प्रीत जागते या मालिकेत काम करताना दिसला होता. सुंदर आमचे घर, जाडूबाई जोरात, श्रावणबाळ रॉकस्टार या मालिकांमध्ये संचिता झळकली होती.
या मालिकेत मल्हार आणि मीराची प्रेम कहाणी बघायला मिळणार आहे. तुम्हाला सुद्धा हि मालिका पाहायला खूप मजा येईल. या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. यामध्ये मीरा आणि मल्हार हे मुख्य पात्र आहे. मीरा म्हणते की, मला एक श्रीमंत राजकुमार माझ्या आयुष्यात हवा आहे. त्यावेळा मल्हार म्हणतो की, मी आहे न तुझा राजकुमार. पण मल्हार हा मालिकेत गरीब दाखवण्यात आला आहे. त्यावेळा मीरा म्हणते तु गरीबांचा राजकुमार आहे. पण मल्हार तेव्हा म्हणतो की मी तुझ्या स्वप्नातील राजकुमार होईल, थोडा वेळ तरी दे. या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उसुक्ता शिगेला पोहोचली आहे. (Siddharth Khirid and Sanchita Kulkarni’s Rani Me Honar series is coming on Sony Marathi)
अधिक वाचा-
–‘जिकत नाही जवर तवर झुंजत राह्याचं’, 25 ऑगस्टला ‘सुभेदार’ होणार प्रदर्शित
–‘बिग बॉस 17’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला? ‘हे’ कलाकार घालणार धुमाकूळ