Monday, April 15, 2024

एकेकाळी सुंदर चेहरा नाही म्हणून नाकारली गेली होती इरफान खानची अभिनेत्री, आता बॉलिवूडमध्येे वाजवतेय डंका

अभिनेत्री राधिका मदानने आपल्या कारकीर्दीची सुरुवात वयाच्या १९ व्या वर्षापासून केली आहे. टीव्ही मालिकांमधून तिने अभिनयाला सुरुवात केली होती. ‘मेरी आशिकी तुम्ही से ही’ या मालिकेमधून राधिका घराघरात पोहोचली होती. बॉलिवूडमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री, राधिका मदानचा वाढदिवस १ मे रोजी होता. नुकताच तिने २५ वा  वाढदिवस साजरा केला आहे. राधिकाच्या वाढदिवशी चाहत्यांनी मनापासून भरभरून प्रेम व्यक्त केले आहे आणि राधिकाला आशीर्वाद दिले आहेत. चाहत्यांचे इतके प्रेम पाहून राधिका भावूक झाली आहे, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांना दिलेल्या शुभेच्छांसाठी एक खास संदेश लिहिला.

“मला माहित आहे की, आमचे जीवन बर्‍याच चढ- उतारांनी वेढलेले आहे. मी आभारी आहे की, या वाढदिवसामुळे मला समजले की, आपण महत्त्व देत नसलो तरी, त्या गोष्टीं महत्त्वाच्या असतात. या वाढदिवसाने मला कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली. मी कृतज्ञ आहे तुम्हा सर्वांची, तुमच्यापैकी ज्याने माझ्या वाढदिवशी मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले. या वर्षी मी काही मागितले, तर फक्त आपल्या सर्वांसाठी प्रार्थना,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika Madan (@radhikamadan)

तिने तिचा सुंदर फोटो शेयर केला आहे, ज्यात तिने गॉगल घातला आहे. तसेच ती पायऱ्यांवर बसून वर बघत आहे. या फोटोत ती कमाल दिसत आहे.

सोशल मीडियाबद्दल बोलायचे तर, राधिका खूप सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी शेअर करत असते. ती ‘पटाखा’, ‘मर्द को दर्द नही होता’, आणि ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटांनंतर राधिका लवकरच ‘शिद्दत’ चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय राधिका ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवर दोन नवीन शोमधून आपला जलवा दाखवणार आहे.

एक काळ असा होता की, राधिकाला तिचा चेहरा सुंदर नाही म्हणून, अनेकांनी नाकारले होते. मात्र, ती याकडे फार लक्ष न देता आपले काम करत राहिली. आता ती बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुराग बसूने कंगनाला दिली ‘अशी’ ट्रेनिंग, इंडस्ट्रीत 17 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनेत्रीला आठवले जुने दिवस

सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

हे देखील वाचा