‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत, अजूनही कोणीच विश्वास ठेवण्यास तयार होत नाहीत की, आता सिद्धार्थ आपल्यासोबत नाही. बुधवारी (१सप्टेंबर)रात्री त्यांची प्रकृती बिघडली आणि गुरुवारी (२सप्टेंबर) सकाळी त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी रात्री उशिरा, टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंतचे कलाकार त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. दरम्यान, त्याच्या मृत्यूनंतर एक नवीन पेच समोर आला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, बुधवारी रात्री सिद्धार्थ घरी पोहोचला, तेव्हा त्याच्या कारच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेने त्याच्या मृत्यूच्या कथेला पूर्णपणे वेगळे वळण दिले आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या आई आणि बहिणींने मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, सिद्धार्थच्या मृत्यूबद्दल त्यांना कोणतीही शंका नाही. एवढेच नाही, तर त्यांनी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये, अशी विनंती केली. दरम्यान, आता आणखी महत्वाची माहिती समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, सिद्धार्थ शुक्ला बुधवारी रात्री घरी पोहोचला. त्याच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा तो घरी आला, तेव्हा त्यांच्या बीएमडब्ल्यू कारची मागील काच फुटली होती. हे पाहता, असा अंदाज लावला जात आहे की, त्याचे कोणाशी तरी मतभेद झाले होते, ज्यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थची कार जप्त केली आहे आणि त्याच्याशी संबंधित तपास देखील सुरू आहे. त्याचवेळी, त्याचे कथित गर्लफ्रेंडशी काही कारणास्तव वाद झाल्याचा दावा माध्यमातून केला जात आहे.
सिद्धार्थने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले, पण त्यांने ‘बिग बॉस १३’च्या पर्वामधून लोकप्रियता मिळाली. सिद्धार्थची अंदाज प्रेक्षकांना खूप आवडला. ‘बिग बॉस १३’ मध्ये शहनाझ गिलसोबत त्याच्या रोमान्सबद्दल बरीच चर्चा झाली आणि नंतर दोघांनी अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर त्यांची ‘सिडनाझ’ नावाची प्रसिद्ध जोडी तुटली. शहनाझला त्याच्या मृत्यूमुळे सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला आहे. तिची खूपच खचली आहे आणि ती कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही. ती फक्त म्हणाली की, “मी आता कसे जगणार.”
सिद्धार्थ अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार होता. तो लवकरच एमटीव्हीचा रियॅलिटी शो ‘एस ऑफ स्पेस’च्या तिसऱ्या पर्वात होस्ट म्हणून काम करणार होता. त्याने अलीकडेच डिझनी प्लस हॉटस्टारची मालिका साईन केली होती. त्याचबरोबर ‘सिडनाझ’ची जोडी लवकरच एका रोमँटिक ड्रामा वेबसीरिजमध्ये एकत्र दिसणार होती. कित्येक महिन्यांपासून तो ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’मध्ये दिसणार आहे, अशी चर्चाही सुरू होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’