‘सिडनाझ’च्या चाहतीला सहन झालं नाही सिद्धार्थच्या मृत्यूचं दुःख, बातमी ऐकताच बाथरूममध्ये पडली बेशुद्ध

‘बालिका वधू’ फेम सिद्धार्थ शुक्ला याच्या मृत्यूने त्याच्या परिवारासोबत संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. प्रेक्षकांची आवडती ‘सिडनाझ’ची जोडी तुटली आहे. आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर एक छाप सोडणारा सिद्धार्थ शुक्ला आज प्रेक्षकांवर असा नाराज झाला आहे, ज्याचा कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल. सिद्धार्थ आता या जगात नाही या गोष्टीवर विश्वास ठेवणे प्रेक्षकांसाठी खूप अवघड होत आहे. त्याचे कुटुंबीय आणि त्याच्या मित्रांसोबत प्रेक्षकांना देखील एवढा चांगला कलाकार गमावण्याचे खूप दुःख आहे.

सिद्धार्थने त्याच्या अभिनयाच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अशातच त्याच्या मृत्यूची बातमी सगळ्यांना हैराण करणारी आहे. माध्यमातील वृत्तानुसार सिद्धार्थचा जवळचा मित्र डॉक्टर जयेश यांनी सांगितले की, सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी सिडनाझच्या एका चाहतीला सहन झाली नाही आणि ही बातमी ऐकताच त्यांची चाहती चक्कर येऊन बेशुद्ध झाली. (sidharth shukla demise sidnaaz fan slip into partial coma after hearing actor death)

डॉक्टर जयेश यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडेलवरून या गोष्टीची माहिती चाहत्यांना दिली आणि सिडनाझच्या चाहत्यांना त्यांच्या कुटुंबासोबत बोलण्याचा सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, “सिडनाझची चाहती सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून बाथरूममध्ये बेशुद्ध झाली. मित्रांनो तुमच्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत बोला, एकटे राहू नका. सिडनाझच्या एका चाहतीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. कारण ती बाथरूममध्ये बेशुद्ध झाली. तुम्ही तुमची काळजी घ्या.”

या चाहतीबाबत आणखी माहिती देताना त्यांनी सांगितले की, “डॉक्टरांनी सांगितले की, ती बेशुद्ध झाली आहे. ती लवकरात लवकर ठीक होईल.” डॉक्टरांनी सांगितले की, “जास्त तणाव आल्यामुळे ती बेशुद्ध झाली आहे. तिच्या शरीराचा कोणताही भाग प्रतिक्रिया देत नाहीये. मला फक्त एवढेच सांगावेसे वाटत की, सगळ्या चाहत्यांनी शांत राहा आणि जास्त विचार करू नका. दुसरीकडे कुठेतरी तुमचे मन रमवा. मला माहित आहे, हे सोप्प नाहीये परंतु आता तुम्ही सिद्धार्थला जाऊ दिले पाहिजे.”

सिडनाझच्या फॅन क्लबला बिग बॉस १३ पासून सुरुवात झाली. बिग बॉसमध्ये सिद्धार्थ आणि शहनाझची जोडी एवढी लोकप्रिय झाली की, त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या दोघांच्या नावाचं मिळून एक नाव तयार केले. त्यांचे चाहते त्यांच्यावर खूप प्रेम करतात. जर सोशल मीडियावर त्यांच्या विरुद्ध कोणी काय बोलले, तर सिडनाझचे चाहते त्यांच्याशी भांडत असे. त्यांचे चाहते नेहमीच त्यांची बाजू घ्यायचे.

सिद्धार्थचे चाहते त्याच्यावर जेवढे प्रेम करतात, तेवढेच प्रेम तो देखील त्याच्या चाहत्यांवर करत होता. शहनाझ आणि सिद्धार्थ जेव्हा एकत्र यायचे, तेव्हा सिडनाझला त्यांच्या पोस्टमध्ये नेहमी टॅग करायचे. जेव्हा सिद्धार्थचे चाहते त्याला सोशल मीडियावर एखादा प्रश्न विचारायचे, तेव्हा तो खूप प्रेमाने त्यांना उत्तर देत असायचा. यासोबत तो त्याच्या चाहत्यांना कोणालाही ट्रेंड करू नका तर सगळ्यांना प्रेम द्या असे सांगायचा.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल

-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’

Latest Post