Monday, July 15, 2024

सिद्धार्थने रोमँटिक पद्धतीने अदितीला दिल्या शुभेच्छा, चाहत्यांना आठवले मंगलाष्टक

अभिनेत्री अदिती राव हैदरी हे फक्त बॉलीवूडच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. अभिनेत्री आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत असताना, असे वृत्त होते की, ती तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी चेन्नईला रवाना झाली आहे. त्याचवेळी, आता सिद्धार्थने आदिती रावसोबतचा एक  फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्याची ही पोस्ट पाहिल्यापासून चाहते त्याला लग्न करण्यासाठी सांगत आहेत.

सिद्धार्थ (siddharth) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्री आदिती (aditi rao hydari) सोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये आदिती सिद्धार्थच्या खांद्यावर हात ठेवून पोझ देत आहे तर सिद्धार्थ सेल्फी काढत आहे. तिच्यासोबतचा फोटो शेअर करत सिद्धार्थने लिहिले, “राजकुमारी आदिती राव हैदरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth (@worldofsiddharth)

अभिनेत्याच्या या पोस्टवर केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. अभिनेत्याच्या या पाेस्टवर कमेंट करताना, झहीर इक्बाल आणि नकुल मेहता यांनी रेड हार्ट इमोजी टाकले, तर दिव्येंदू शर्माने कमेंट करत लिहिले की, “नजर ना लागे” याशिवाय चाहतेही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले, “तुम्ही दोघे एकत्र छान दिसता”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले, “दादा वहिनी मिळाली.” त्याचवेळी दुसऱ्याने विचारले, ‘तुम्ही दोघे लग्न करणार आहात?’

‘महा समुद्रम’ चित्रपटाच्या सेटवर दाेघांची भेट
सिद्धार्थ आणि अदिती गेल्या वर्षी ‘महा समुद्रम’ चित्रपटाच्या सेटवर भेटले होते, त्यानंतर त्यांनी एकमेकाना डेटिंगला सुरुवात केली. महत्वाच म्हणजे दोन्ही स्टार्सनी डेटिंगच्या अफवांना नाकारलं नाही. गेल्या वर्षी चंदीगडमध्ये राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नातही दोघे एकत्र दिसले होते.

आदितीच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले, तर आदिती नेटफ्लिक्ससोबत संजय लीला भन्साळी यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहे. त्याचवेळी सिद्धार्थ शेवटचा वेब सीरिज ‘एस्केप लाईव्ह’मध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बाबाे! इंडियन आयडलचा पर्दाफाश करणारा गायकच कार्यक्रमात पाहुणा म्हणुन उपस्थित
सुधांशूने उर्फीला म्हटले, ‘अश्लील’; संतापून अभिनेत्री म्हणाली, ‘तुझा शो बघितला’

हे देखील वाचा