अभिनेता सिद्धार्थ पंचतत्वात विलीन, आईनेच दिला लाडक्या मुलाला मुखाग्नी

अखेर सिद्धार्थ शुक्ला पंचतत्वात विलीन झाला आहे. मागील अनेक तासांपासून सुरू असलेला सिद्धार्थचा प्रवास थांबला. ब्रह्मकुमारी प्रथेनुसार त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या आईने मोठ्या हिंमतीने आपल्या मुलाला मुखाग्नी दिला. खूप लवकर वडिलांचे छत्र हरपल्यामुळे आईनेच सिद्धार्थला आणि त्याच्या बहिणींना एकटीने सांभाळत मोठे केले. ज्या आईने या मुलांना धीराने मोठे केले त्यांची ढाल बनून त्यांच्यासोबत राहिली, त्याच आईने आज सिद्धार्थला अग्नी दिली. सिद्धार्थ त्याच्या आईच्या खूपच जवळ होता. ‘बिग बॉस १३’ मध्ये अनेक क्षण आपल्याला पाहायला मिळाले. जेव्हा सिद्धार्थ त्याच्या आईच्या आठवणीने भावुक झाला होता. त्याची आई त्याला बिग बॉसच्या घरात भेटायला आली, तेव्हा तर तो ओक्साबोक्सी रडला होता.

घरात स्त्रियांमध्ये सिद्धार्थ एकच पुरुष होता. याची त्याला संपूर्ण जाणीव होती, त्यामुळे तो त्याच्या संपूर्ण जबाबदाऱ्या खूपच उत्तम पद्धतीने पार पाडत होता. सिद्धार्थने खूप आधी त्याच्या बहिणींना गाडी गिफ्ट करणार हे वचन दिले होते. नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनाच्या दिवशी सिद्धार्थने त्याच्या बहिणींना गाडी दिली. भर पावसातही हजारोंच्या संख्येने चाहते, मित्र, नातेवाईक, कलाकार उपस्थित होते.

सिद्धार्थने २००८ साली त्याच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. ‘वर्ल्डस बेस्ट मॉडेल’ असलेल्या सिद्धार्थने ‘बालिका वधू’ मालिकेतून अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. या मालिकेनंतर त्याने कधीच मागे वळून पहिले नाही. एकामागून एक हिट मालिका दिल्या. त्याच्या अभिनयाच्या जोरावरच त्याने बॉलिवूडमध्ये थेट धर्म प्रोडक्शनचा ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ सिनेमा मिळवला. त्यानंतर तो सतत यशाच्या पायऱ्या चढत राहिला. डिजिटल माध्यमातही त्याने यश मिळवले.

आज सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला. या मनोरंजन क्षेत्राने सिद्धार्थच्या रूपाने गमावलेला उत्तम अभिनेता आता परत येणार नाही.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या निधनाने एक्स गर्लफ्रेंड शेफाली भावुक; म्हणाली, ‘विश्वास ठेवणे खूपच कठीण’

-सिद्धार्थ शुक्लाप्रमाणेच ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी देखील घेतला कमी वयात याजगाचा निरोप, जाणून घ्या त्यांची नावे

-‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

Latest Post