Monday, June 9, 2025
Home टेलिव्हिजन सिद्धार्थ अन् शहनाझमध्ये खरंच प्रेम होतं की आणखी काय?

सिद्धार्थ अन् शहनाझमध्ये खरंच प्रेम होतं की आणखी काय?

सन २०२० हे वर्षे जर कोणी गाजवलं असेल, तर तो स्टार म्हणजेच सिद्धार्थ शुक्ला. कारण, १५ फ्रेबुवारी, २०२० रोजी त्याने बिग बॉस १३च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. पण २०२१ या वर्षी त्यानं जणू सर्वांनाच ४४० व्होल्टपेक्षा मोठा शॉकच दिला. २ सप्टेंबर, २०२१ रोजी त्यानं या जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्यानं कलाविश्वात पोकळी निर्माण झाली. पण सगळ्यात मोठा धक्का बसला, तो शहनाज गिल हिला. आजही तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात सिद्धार्थच्या आठवणी जिवंत असतीलच. त्यांच्यात काहीतरी होतं बरं का? मैत्रीच्या थोडं पलीकडचं आणि प्रेमाच्या थोडं अलीकडचं. नेमकं तेच आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

बिग बॉसने सिडनाझची जोडी बनवली खरी, पण तिला प्रेम दिले, ते तुम्हा प्रेक्षकांनी. जेव्हा बिग बॉसचा प्रवासाला सुरुवात केली होती, तेव्हा तिने फक्त घरातील स्पर्धकांनाच नाही, तर खुद्द भाईजान सलमान खानलाही इम्प्रेस केलं होतं. घरात आल्यानंतर खोडकर शहनाझ सर्वांच्या मनात जागा बनवली होती. पण कुणाला माहीत होतं की, ही खास जागा सिद्धार्थ शुक्लाच्याही मनात बनणारंय. या दोघांमध्ये काही कारणांमुळे खटके जरी उडत असले, तरी या दोघांची ऑनस्क्रीन बाँडिंग सर्वांना आवडत होती.

जर तुम्हाला आठवत असेल, तर कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंग एकदा म्हणाली होती की, सिद्धार्थ जेव्हा नाराज होतो, तेव्हा त्याला फक्त शहनाजच समजवू शकते. दोघं एकमेकांची काळजीही घेतात. इतकंच नाही, तर दोघांची जोडी सोशल मीडियावरही सर्वांना आवडते.

एकदा खुद्द सिद्धार्थच म्हणाला होता की, त्याला शहनाझची एकही गोष्ट आवडत नाही. पण त्याला ती आवडते. दुसरीकडं शहनाझही खूप वेळा म्हणालीय की, तिला सिद्धार्थची गरज आहे आणि ती त्याच्यावर प्रेम करते. शहनाझ आणि सिद्धार्थ बिग बॉसच्या घरात अनेकदा रुसणं- मनवण्याचा खेळ खेळायचे. पण नेहमी शहनाझला वाटायचं की, तिलाच सिद्धार्थला मनवण्यासाठी जावं लागतं. ते एकमेकांच्या इतक्या जवळ होते की, ते एकमेकांची काळजी घ्यायचे. इतकंच नाही, तर ते बिग बॉसच्या घरात एकमेकांचा बेडही शेअर करायचे.

शोमध्ये त्यांचं रुसणं-मनवणं, प्रेम, मैत्री या सगळ्या गोष्टींना पसंत केलं जायचं. पण कुठं ना कुठं त्यांच्या या रुसणं- मनवण्याला इरिटेटिंगही बोललं गेलंय. यामुळं वीकेंड वारला सलमाननं शहनाझबद्दल सिद्धार्थला वॉर्निंगही दिली होती. पण तरीही शहनाझच्या प्रती सिद्धार्थचं प्रेम कधी कमी झालंच नाही. जेव्हा वीकेंडचा वार आला होता, तेव्हा शहनाझच्या वडिलांनीही त्यांच्या नात्याला हिरवा कंदील दाखवला होता. पण जेव्हा सिद्धार्थची आई बिग बॉसच्या घरात आली, तेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल एक शब्दही काढला नव्हता. उलट त्यांनी तर रश्मी देसाईसोबत जास्त चर्चा केली होती.

बिग बॉस १३ दरम्यान जेव्हा प्रेस मीटिंग झाली, तेव्हा शहनाझला तिच्या प्रेमाबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा शहनाझ म्हणाली होती की, सिद्धार्थसाठी कसली फिलींग आहे माहीत नाही, पण त्याच्याबद्दल फिलींग तर आहे. जेव्हा सिद्धार्थला हे विचारण्यात आलं, तेव्हा तो म्हणाला होता की, माहीत नाही, हा तिचा गेम आहे, फेक आहे, रियल आहे, मला फरक पडत नाही. मला तर फक्त तिच्यासोबत वेळ घालवायला आवडते. आम्ही घरात आहोत तोपर्यंत चांगले आहोत. जर बाहेर हिला वाटलं, तर ती गौतमसोबतही जाऊ शकते. त्यावर लगेच शहनाझ म्हणते की, नाही नाही असं काही नाही.

हेही पाहा- सिडनाझचे मैत्रीच्या थोडं पलीकडंच आणि प्रेमाच्या थोडं अलीकडचं नातं

आता यावरून समजतं की, दोघांमध्ये खरंच मैत्रीच्या थोडं पलीकडचं आणि प्रेमाच्या थोडं अलीकडचं असंच काहीसं नातं होतं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा