Wednesday, July 3, 2024

सिद्धार्थ चांदेकर त्याचे ‘ते’ खास स्वप्न पूर्ण करण्यासाठी तब्बल 7224 किलोमीटर प्रवास करत गेला सातासमुद्रापार

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते दोघे सतत सक्रिय असतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ते सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असातात.

सिद्धार्थ आणि मितालीने प्रचंड मोठा चाहता वर्ग कमावला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सिद्धार्थला चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाते. सिद्धार्थ हा उत्तम अभिनेता आहे. त्याने केलेल्या मालिका आणि चित्रपट कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात. तर मिताली गुणी अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणून सुरुवात करून तिने आज मराठी मनोरंजनविश्वात मालिकांमधून आणि चित्रपटामधुन प्रचंड नाव कमावले आहे.

या दोघांची जोडी फनी व्हिडिओ, फोटो सतत शेअर करताना दिसतात. अशातच नुकताच मितालीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. काही दिवसांपुर्वी सिद्धार्थ आणि मिताली स्पेन, फ्रान्समध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसले. त्यावेळीचे दोघांनीही काही फोटो सोशल मीडियावर टाकले होते. हे दोघं सतत एकत्र फिरताना आणि सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात. मात्र आता तिने सिद्धार्थला एक वेगळीच आणि एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थ त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तब्बल 7224 किलोमीटर सातासमुद्रापार गेला आहे. सिद्धार्थचा हॅन्स झिमर हा आवडता गायक आहे. त्याच्या कॉन्सर्टला आयुष्यात एकदातरी जावे अशी त्याची इच्छा किंबहुना स्वप्नच होते. आता त्याचे हे स्वप्न सत्यात उतरत आहे.

सिद्धार्थचा एक व्हिडिओ शेअर करताना मितालीने लिहीले की, “या कॉन्सर्टची आठवण आमच्या कायम लक्षात राहील…कॉन्सर्टच्या जागेपर्यंत पोहचण्याच्या वेळीचा सिद्धार्थच्या चेहऱ्यावर असणारा आनंद बघण्यासारखा होता. त्याची प्रचंड घालमेल होत होती. कॉन्सर्टपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने तो प्रचंड संतापला होता. त्यावेळी तो अगदी लहान मुलासारखा वागत होता. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, त्यावेळी सिद्धार्थला खूप आनंद झाला होता. तेव्ही मी देखील आनंदी झाले होते.”

हे देखील वाचा