Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड ‘हा’ आहे सिद्धार्थ मल्होत्राचा फिट राहण्याचा फंडा, व्हिडिओ शेअर करून दिल्या टीप्स

‘हा’ आहे सिद्धार्थ मल्होत्राचा फिट राहण्याचा फंडा, व्हिडिओ शेअर करून दिल्या टीप्स

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा बॉलिवूडमधील फिट अभिनेत्यापैकी एक आहे. सोशल मीडियावर देखील तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याचे फिटनेस फोटो आणि व्हिडिओ नेहमीच तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच तिने पुन्हा एका त्याच्या फिटनेसचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो झाडाला लटकून व्यायाम करताना दिसत आहे.

या दिवसात सिद्धार्थ (sidharth malhotra) मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये त्याच्या आगामी ‘योद्धा’ या चित्रपटाच्या शूटिंग शमध्ये व्यस्त आहे. परंतु व्यस्त असताना देखील तो वेळ काढून फिटनेस स्टंट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “कोणतीही जिम नाही, वेळ नाही, कोणतेही कारण नाही, मला फक्त एक झाड पाहिजे.” (Sidharth Malhotra has revealed the secret of his great fitness in video)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सिद्धार्थने राखाडी रंगाची हुडी, जोगर पँट आणि स्निकर्स घातले आहेत. या लूकमध्ये तो अगदी स्टनिंग दिसत आहे. तो झाडाच्या फांदीला लटकून व्यायाम करताना दिसत आहे. त्याचा हा व्यायाम पाहून त्याचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत. तसेच सगळ्यांना प्रेरणा मिळाली आहे.

तसेच त्याने लिहिले आहे की, “निसर्गात व्यायाम करणे खूप चांगली गोष्ट आहे.” तसेच त्याने तो ज्या गावात शूटिंग करत आहे. तेथील बकऱ्यांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तो शूटिंग करताना तेथील नैसर्गिक वातावरणाचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्ट तो उपभोगत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा

OTT प्लॅटफॉर्म ठरलं लकी! सर्वाधिक पाहिले गेलेले तीन चित्रपट खिलाडी कुमारचेच

हे देखील वाचा