Friday, March 29, 2024

OTT प्लॅटफॉर्म ठरलं लकी! सर्वाधिक पाहिले गेलेले तीन चित्रपट खिलाडी कुमारचेच

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अनेकवर्ष राज्य केलं आहे. मात्र, 2022 हे वर्ष अभिनेत्यासाठी खूपच खराब गेलं. गेल्या वर्षी त्याचे सगळे चित्रपट बॉक्सऑफिसवर जोरदार आपटले. ‘सुर्यवंशी‘ हा त्याचा 2021 मधील आलेला सर्वाधिक हिट ठरलेला शेवटचा चित्रपट होता. पण यानंतर अक्षयचे लागोपाठ चित्रपट फलॉप ठरले. मात्र, अक्षयच्या काही चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हॅट्रिक मारली आहे.

अभिनेता अक्षय कुमार (Akhay Kumar) याचे गेल्या वर्षात लगोपाठ चित्रपट फलॉप ठरले होते मात्र, त्याच चित्रपटांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. 2020 मधील अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब’ डिस्ने प्लस हॉटस्टारवर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरला आहे.

2021 मधील अक्षयचा सुर्यवंशी (Suryavanshi) या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई केली. त्याशिवया ओटीटी प्लॅटफॉर्मवरही दर्शकांचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. यानंतर अक्षयचा ‘कठपुतली’ हा चित्रपट ओटीटी हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. कठपुतली हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटाच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. त्याशिवाय अभिनेत्याेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे स्पष्ट केले होते.

 

View this post on Instagram

 

 

2021 नंतर अक्षयच आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan), धनुष (Dhanush) हे धमाकेदार कलाकरा होते. यानंतर बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज चव्हान, रक्षाबंधन, सारखे बिग बजेट चित्रपट बॉक्सऑफिसवर जोरदार आपटले. नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला ‘राम सेतू’ हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू शकला नाही. अक्षय आता ‘ओ माय गॉड 2’ आणि ‘सेल्फी’ या दोन चित्रपटात झळकणार आहे, शिवाय ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटातही अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा
“खोटे गोड बोलण्यापेक्षा कडू सत्य बोला”; केतकीनं चाहत्यांना दिल्या काटेरी शुभेच्छा
हॅपी मंकरसंक्रात! अमृता फडणवीसांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा