Monday, January 13, 2025
Home बॉलीवूड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी अडकणार लग्नबंधनात, समोर आली मोठी माहिती

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी अडकणार लग्नबंधनात, समोर आली मोठी माहिती

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी(Kiara Advani) हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं आहे. ​​याच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा ​​थँक गॉड या चित्रपटाचे प्रमोशन करत होता, त्यावेळी त्याला लग्नाबाबत वारंवार प्रश्न विचारले जात होते. सिद्धार्थने स्पष्टपणे काहीही सांगितले नाही पण हावभावात सांगितले की, तो कियारा अडवाणीसोबत विवाहबंधनात अडकणाच्या विचार करत आहे.ही बातमी समोर येताच त्यांचे चाहते खूप आनंदी झाले आहेत. माध्यमाच्या वृत्तानुसार विश्वास ठेवला तर, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​सध्या त्यांच्या लग्नासाठी योग्य ठिकाण शोधत आहेत.

माध्यमाच्या वृत्तानुसार, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी याआधी गोव्यात लग्न करण्याची योजना आखत होते, परंतु अभिनेत्यामुळे हा प्लॅन रद्द करण्यात आला आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, दोघेही अनेक महिन्यांपासून लग्नाची ठिकाणे शोधत आहेत. असे कळलं आहे की कियारा आणि सिद्धार्थ चंदीगडमध्ये आलिशान ठिकाण शोधत आहेत जिथे ते थाटामाटत लग्न करु शकतात. चंदीगडमधील ओबेरॉय सुखविला स्पा आणि रिसॉर्टमध्ये लग्नासाठी ते विचार करत आहेत. याच ठिकाणी राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा यांचे लग्न झाले होते. असेही बोलले जात आहे की याआधी दोघेही गोव्यात लग्न करण्याचा विचार करत होते, परंतु सिद्धार्थचे मोठे पंजाबी कुटुंब असल्यानं त्यांनी लोकेशन रद्द केली.

 

View this post on Instagram

 

करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये दोघांच्या लग्नाची चर्चा झाली होती. याशिवाय अलीकडेच सिद्धार्थ मल्होत्रा ​​त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खानच्या शो बिग बॉस 16 मध्ये पोहोचला होता. यादरम्यान सलमान खानने सिद्धार्थ मल्होत्राला त्याच्या लग्नाबद्दल आगाऊ शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे लग्नाच्या शुभेच्छा देताना सलमान खान सतत कियारा अडवाणीचा उल्लेख करताना दिसून आला. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आयडिया ही आलीच होती.

डिसेंबरमध्ये लग्न होऊ शकते
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​या वर्षी डिसेंबर महिन्यात लग्न करू शकतात. शेरशाहच्या काळात सिद्धार्थ आणि कियारा यांची मैत्री झाली आणि त्यांची मैत्री लवकरच प्रेमात बदलली. दीड वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कियारा आणि सिद्धार्थने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​नुकत्याच ‘थँक गॉड’ या चित्रपटात दिसला होता. आता सिद्धार्थ ​​’योधा’ आणि ‘मिशन मजनू’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
सिद्धांत चतुर्वेदीने नव्या नवेलीला डेट करण्याबाबत तोडले मौन; म्हणला,’ मी कोणाला…’

भारतात परतल्यानंतर प्रियांका चोप्रा आता मुंबईतील मरिन ड्राइव्हन केली मौजमस्ती; व्हिडिओ तुफान व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा