Monday, July 1, 2024

सिद्धार्थच्या अंतिम दर्शनाला पोहचली संभावना, ‘या’ कारणामुळे पोलिसांनी लगावली तिच्या पतीच्या कानशिलात

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा शुक्रवारी (३ सप्टेंबर) पंचतत्वात विलीन झाला आहे. त्याच्या अंतिम संस्काराच्या वेळी त्याचे कुटुंबीय, काही नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. ब्रह्माकुमारी रीतीरिवाजानुसार सिद्धार्थच्या देहावर अंतिम संस्कार करण्यात आले. अशातच ओशिवारा स्मशान भूमीमधून एक बातमी समोर आली आहे. सिद्धार्थच्या अंतिम संस्काराच्या वेळी तिथे उपस्थित असलेली भोजपुरी स्टार संभावना सेठ आणि तिचा पती अविनाश द्विवेदी याचे मुंबई पोलिसांसोबत भांडण झाले.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्या व्हिडिओमध्ये अविनाश आणि पोलिसांमधील भांडणे स्पष्ट दिसत आहे. यामध्ये संभावना सेठ देखील रागात पोलिसांशी भांडताना दिसत आहे. परंतु नक्की त्यांच्यामध्ये काय झाले आहे याची माहिती समोर आली नाही. परंतु आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, संभावना सेठ तिचा पती अविनाशसोबत स्मशान भूमीत गेली होती. तिथे सगळेजण पांढऱ्या रंगाच्या पोशाखात होते, पण तिच्या पतीने वेगळ्या रंगाचे कपडे घातले होते. (sidharth shukla funeral scuffle broke out between sambhavana seth husbund avinash and police)

सिद्धार्थची फॅन फॉलोविंग तर सर्वांनाच माहित आहे. सिद्धार्थला शेवटचे बघण्यासाठी स्मशान भूमीच्या बाहेर चाहत्यांची खूप गर्दी झाली होती. मीडियावाले देखील तिथे आले होते, पण त्यांना केवळ मुख्य गेटवर उभे राहण्याची परवानगी मिळाली होती. गर्दी कंट्रोल करण्यासाठी तिथे अनेक पोलीस देखील उपस्थित होते. अशातच संभावना तिच्या पतीसोबत आतमध्ये जाऊ लागली, तेव्हा गर्दी कंट्रोल करण्यासाठी पोलिसांनी तिचा पती अविनाशला थांबवले.

अविनाशला रंगीत कपड्यात आणि हातात मोबाईल बघून पोलिसांना वाटले की, मीडियामधील व्यक्ती आहे. यामुळे पोलिसांनी त्याला थांबवले. त्यांच्यात थोडे वाद झाले आणि नंतर त्यांच्यात धक्का-बुक्की चालू झाली. यावर संभावनाला देखील खूप राग आला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका पोलीस अधिकाऱ्याने तिचा पती अविनाशच्या कानशिलात मारली. यातच एक व्यक्ती तिथे उपस्थित असतो, जो हात जोडून संभावनाला शांत राहायला आणि सिद्धार्थच्या अंतिम दर्शनाला जाण्यासाठी सांगतो.

यातच अशी बातमी समोर आली आहे की, अविनाश त्याच्यासोबत कॅमेरा घेऊन आला होता, जेणेकरून तो त्याचा ब्लॉग शूट करू शकेल. परंतु याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आली नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल

-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’

हे देखील वाचा