‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचा गुरुवारी (२ सप्टेंबर) मृत्यू झाला होता. त्याच्या निधनानंतर संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या ४० वर्षीय मुलाला गमवल्याने त्याच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शुक्रवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक चाहते, मोठ-मोठे कलाकार आणि प्रत्येक चाहता सिद्धार्थला आपल्या पद्धतीने श्रद्धांजली वाहत होते आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत होते. अशात अभिनेत्री राखी सावंतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सिद्धार्थची आई राखीला काय बोलल्या
राखी सिद्धार्थच्या घरी त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेली होती. त्यावेळी सिद्धार्थची आई सारख्या बोलत होत्या की, “तो निघून गेला… तो निघून गेला.” त्यांची परिस्थिती पाहून सर्वांनाच अश्रू अनावर होत आहेत. सिद्धार्थने खूप कमी वयामध्ये त्याच्या वडिलांना गमावले होते. त्यांनतर त्याच्या आईने त्याला आणि त्याच्या दोन्ही बहिणींना लहानाचे मोठे केले. आता मुलाच्या कारकिर्दीत आराम करण्याच्या दिवसात तो त्यांना अशा पद्धतीने सोडून गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. (Sidharth Shukla mother is broken after her son death actress Rakhi Sawant share video on social media)
राखीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या घरातील तेव्हाचे वातावरण कसे होते हे तिने सांगितले. ती म्हणाली की, “मी आताच सिडच्या घरून आले. घरामध्ये खूप वाईट परिस्थिती होती. त्याची आई भानात नाहीये. आई मला फक्त तो निघून गेला एवढंच बोलत होत्या. त्यांची परिस्थिती मला बघवत नव्हती.”याव र राखी सिद्धार्थच्या आईला म्हणाली की, “आई तो कुठेच नाही गेला. तो तुमच्या रक्तात आहे. तुमच्या आठवणीत आहे. माणूस जातो, त्याच शरीर जातं, पण त्याची आत्मा इथेच असते. सिद्धार्थ देखील इथेच आहे.”
सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी केले ‘हे’ विधान
त्याचे कुटुंबीय म्हणाले की, “आम्हाला देखील तुमच्या एवढाच धक्का बसला आहे. परंतु सिद्धार्थ आपले खासगी आयुष्य खूप कमी वेळा माध्यमांसमोर मांडत होता. त्यामुळे कृपया त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांच्या खासगी गोष्टींचे भान वाठे. सर्वांनी त्याच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करा.”
माध्यमांवर सतत त्याच्याविषयी येत असलेल्या माहितीमुळे त्याच्या कुटुंबीयांनी हे विधान केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…