दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला सर्वांना एक धक्का मोठा देऊन गेला आहे. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. जरी सिद्धार्थ आज आपल्यासोबत नसला, तरी पण तो नेहमीच त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत असेल. सिद्धार्थचे चाहते त्याला कधीच आपल्या आठवणीतून जाऊ देणार नाहीत. गुरुवारी सिद्धार्थचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक निधन झाले. त्यानंतर त्याचे काही जुने व्हिडिओ आणि ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्याने असे म्हटले आहे की, “लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे.”
सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर रोजी अचानक निधन झाले. त्याला त्याच्या मुंबईतील घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात घेऊन जाण्याअगोदरच त्याचे निधन झाले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचवेळी त्याच्या जुन्या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ त्याच्या एका चाहत्याला लवकरच बरे होण्याचा संदेश देत होता. व्हिडिओमध्ये सिद्धार्थने म्हटले होते की, “लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे.” (Saying ‘Lambi hai zindagi, milenge phirse’, Siddharth Shukla said goodbye to everyone)
व्हिडिओमध्ये सिद्धार्थ शुक्ला म्हणतो की, “अरे बग, मला माफ कर, आपण भेटू शकलो नाही. मला असं कळालं की, तुझ्या बहिणीची तब्येत ठीक नाही. मला आशा आहे की ती ठीक होईल. माझे सर्व प्रेम आणि प्रार्थना तिच्यासोबत आहेत. मला माहित आहे की, ती लवकरच बरी होईल. तुम्ही काळजी घ्या आणि आयुष्य हे खूप मोठे आहे, पुन्हा भेटू. काळजी घ्या.”
या अगोदर सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचेही अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. एका व्हिडिओमध्ये सिद्धार्थ शहनाजला म्हणत होता की, “जेव्हा तुला माझ्या मदतीची गरज असेल, तेव्हा मी केवळ एक कॉल इतका दूर असेल.” त्याचबरोबर भविष्याबद्दल विचार करत तो म्हणाला की, “इतकेच नव्हे तर तु ७० वर्षांची झाली आणि तेव्हा मी जिवंत असलो तरीही तु मला मोकळेपणाने फोन करा.”
The day this scene/emotions/attachment gets recreated , then question them!
“ agar tu 70 years ki bhi hojayegi aur agar mein zinda raha toh to mujhe call kregi”????♥️#SidNaaz pic.twitter.com/acp5Kt9BLu
— Nat. (@imnutellala) October 9, 2020
सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले तेव्हा तो अवघ्या ४० वर्षांचा होता. माध्यमांतील वृत्तानुसार, सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषध घेतले होते. त्यानंतर तो उठलाच नाही. सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबात त्याची आई आणि दोन बहिणी आहेत. या धक्क्याने त्याच्या जवळच्या व्यक्तींनाच नाही तर त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन
-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल
-सिद्धार्थ शुक्लाने शहनाझ गिलच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास? म्हणाली, ‘मी आता कसं जगू शकेन’