Friday, July 5, 2024

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण: गायकावर गोळ्या झाडणारे दोन शुटर पुण्यातले असल्याची धक्कायदायक माहिती समोर

पंजाबी गायक असलेल्या सिद्धू मूसेवालाच्या हत्येने संपूर्ण देशात एकच खळबळ निर्माण केली. केवळ २८ वर्षाच्या सिद्धू मूसेवालाची २९ मे रोजी अचानक हत्या करण्यात आली. भर दिवसा गाडीतून जात असताना त्याच्यावर गोळीबार करत सिद्धू मूसेवालाचा खून झाला. या हत्येनंतर एकच प्रश्न सारखा विचारला गेला आणि तो म्हणजे सिद्धूची हत्या कोणी आणि का केली? या हत्येची जबादारी लॉरेन्स यांनी घेतली आणि त्यानंतर हळूहळू याबाबत नवनवीन खुलासे होऊ लागले. आपल्या जीपमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धूला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले आणि त्याने या जगाचा निरोप घेतला.

सिद्धूच्या हत्येवर आलेली एक महत्वाची माहिती म्हणजे त्याच्यावर आठ जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. आता या आठ लोकांपैकी दोन लोकं पुण्यातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी या दोन पुण्याच्या शूटरची नावे असल्याचे सांगितले जात आहे. या आठ लोकांपैकी तीन शुटर पंजाबचे, तीन राजस्थानचे आणि दोन महाराष्ट्राचे आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्र्नोई याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या हत्येचे पुणे कनेक्शन समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस देखील या केसमध्ये जोरात तपास करताना दिसत आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याच्या संशयावरून संतोष आणि सौरभ या २ जणांविरुद्ध लुकआउट नोटीस काढण्यात आली आहे. या दोघांनाही गुन्हेगारीची पार्श्वभूमी असून संतोष जाधव हा मंचर येथील गुन्हेगार ओंकार उर्फ रानिया बाणखेले या खुनाच्या आरोपाखाली फरार आहे. पुणे गुन्हे शाखा संतोष जाधवचा तपास घेत आहे.

तत्पूर्वी संतोष जाधवने सोशल मीडियावर ‘सूर्य उगवताच मी तुला संपवून टाकेन’, असे स्टेटस देखील सांगितले आहे. या स्टेटसला उत्तर देताना ओंकारने संतोष जाधवला भेटून मारहाण करणार असल्याचे लिहिले. ओंकार उर्फ रानिया बाणखेले याच संतोषने १ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून येत भरदिवसा त्याची गोळी घालून हत्या केली होती. संतोष आणि सौरभ दोघेही लॉरेन्स बिष्णोईच्या गॅंगमधील असल्याचे समोर आले. दरम्यान सिद्धू मुसेवाला याची हत्या झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला देखील लॉरेन्स बिष्णोईच्या गँगने जिवेमारण्याची धमकी दिली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा