Wednesday, July 3, 2024

‘सिडनाझ’च्या शेवटच्या गाण्याचे नाव बदलल्यामुळे भडकले चाहते; म्हणाले, ‘…हे अधुरे बिधुरे नको’

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे बॉलिवूडमधील सर्व कलाकारांसह लाखो चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. यावेळी त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाझ गिल देखील पूर्ण खचून गेली होती. २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूला आता एक महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे. मात्र, त्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात तशाच आहेत. अशात सध्या सोशल मीडियावर सिडनाझच्या एका गाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

सिद्धार्थच्या मृत्यूपूर्वी तो आणि शहनाझ एका गाण्यासाठी काम करत होते. ‘हॅबिट’ असे त्या गाण्याचे नाव होते. सिद्धार्थच्या मृत्यूमुळे हे गाणे अद्याप प्रदर्शित झाले नाही. मात्र, आता या गाण्याच्या निर्मात्यांनी हे गाणे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांनी यामध्ये जो बदल केला आहे, तो पाहून सिडनाझचे चाहते नाराज झाले आहेत. त्यांना हा बदल अजिबात मान्य नाही.

म्युझिक कंपनी सारेगामाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गाण्याचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये गाण्याचे ‘हॅबिट’ हे शीर्षक बदलत त्यांनी ‘अधुरा’ असे लिहिले आहे. तसेच या नावाखाली ‘एक अधुरा गाना एक अधुरी कहानी’ असे लिहीत पेटलेल्या मेणबत्तीचा फोटो लावण्यात आला आहे. सिडनाझच्या चाहत्यांना हे अजिबात आवडलेले नाही. अनेकांनी सारेगामावर टीका केली आहे की, ते सिद्धार्थच्या नावावर व्यवसाय करत आहेत.

सिद्धार्थ शुक्ला नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देखील कमेंटमध्ये लिहिले आहे की, “जर मी चुकीचा नसेल, तर या गाण्याचे नाव आधी ‘हॅबिट’ असे ठेवण्यात आले होते. श्रेया मॅडम हे अनोखे असल्याचे म्हटल्या होत्या. त्यांनी हे नाव ‘अधुरा’मध्ये का बदलले.”

यावर समीराने देखील प्रतिक्रिया देत लिहिले की, “आम्हाला खरं नाव पाहिजे. गाणं एक मिनिटांचं असलं तरी चालेल, पण खरंच नाव पाहिजे. हे अधुरे बिधुरे नको आहे आणि सिद्धार्थला देखील टॅग केलेलं पाहिजे.”

अशाप्रकारे अनेक चाहत्यांच्या कमेंट या शीर्षकावर आलेल्या आहेत. आता सारेगामाहे नाव केव्हा बदलणार आणि गाणं केव्हा प्रदर्शित होणार याकडेच सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम फ्रिडा पिंटो लवकरच होणार आई, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

-प्रतिक्षा संपली! ‘भाईजान’ने जाहीर केली ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख, टिझर पाहूनच चाहते खुश

-मोठी बातमी! ईडीकडून नोरा अन् जॅकलिनला समन्स; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्रींची कसून चौकशी

हे देखील वाचा