Friday, April 19, 2024

‘स्लमडॉग मिलेनिअर’ फेम फ्रिडा पिंटो लवकरच होणार आई, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

‘स्लमडॉग मिलेनिअर’ चित्रपटातील अभिनेत्री फ्रिडा पिंटोच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. या आनंदात तिच्या मैत्रिणींनीतिचे बेबी शॉवर केले आहे. फ्रिडाने तिच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फ्रिडा बेबी बंपसोबत या फोटोंमध्ये खूपच क्युट दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन घातला असून, जो तिच्या सौंदर्यात चार चाँद दिसत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला, फ्रिडाने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कोरी ट्रॅनसोबत फोटो शेअर करून चाहत्यांना तिच्या प्रेग्नन्सीविषयी माहिती दिली होती. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘बेबी ट्रॅन येणार आहे’. २०१९ मध्ये फ्रिडाने कोरी ट्रॅनशी लग्न केले. तिचा पती कोरी हा एक एडवेंचर फोटोग्राफर आहे.

तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर करताना फ्रिडाने लिहिले, या अविस्मरणीय बेबी शॉवरबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय बहिणींच्या टीमचे आभार, ज्यांनी हा दिवस माझ्यासाठी खास बनवला. फिनिशिंग टच सुंदर केल्याबद्दल धन्यवाद. मी स्वतःला खूप भाग्यवान आणि लकी समजते.’

फ्रिडा तिच्या पहिल्याच चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध झाली. तिचा पहिल्या चित्रपट ”स्लमडॉग मिलेनिअर” ने तिला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. फ्रिडा पिंटोने चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी चार वर्षे मॉडेलिंग केले होते. तसेच तिने अनेक इंटरनॅशनल अवॉर्ड शोमध्ये अँकरिंगही केली होती. तिच्या पहिल्या चित्रपटाला आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.

ती एक मुलाखतीत म्हणाली होती की, तिला ”स्लमडॉग मिलेनिअर” चित्रपटानंतर खूप चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण तिने त्यांना सरळ नकार दिला. कारण तिला आराम हवा होता. ती हे देखील म्हणाली की मला माहित आहे कलाकारांनसाठी ब्रेक घेणं खूप अवघड आहे. पण मला माझा निर्णय खूप आवडला. फ्रिडाने ‘लव्ह सोनिया’ नावाचा २०१८ साली चित्रपट केला आहे. तसेच फ्रिडा देव पटेल ,पोलो प्लेयर बकाडीसोबत रेलशनशिपमध्ये होती. फ्रिडा आणि ”स्लमडॉग मिलेनिअर” फेम अभिनेता देव पटेल हे दोघे ६ वर्ष एकमेकांना डेट करत होते. पण काही कारणांमुळे त्यांचे ब्रेकअप झाले. नंतर ती पोलो प्लेयर बकाडीसोबत नात्यात होती.पण तेही नात टिकलं नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

-ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा किंग खानला पाठिंबा; म्हणाले, ‘…इंडस्ट्रीमध्ये सर्व भित्र्या व्यक्ती’

-सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा