Saturday, June 29, 2024

सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझ गिलने फोडला हंबरडा, तिचा रडतानाचा व्हिडिओ पाहून चाहतेही भावुक

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूला जवळपास अडीच महिने उलटले आहेत, पण शहनाझ गिल आणि त्याच्या जोडीला चाहते अजूनही विसरलेले नाहीत. ‘बिग बॉस १३’मध्ये शहनाझ गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. शहनाझनेही अनेकवेळा सिद्धार्थसमोर आपले प्रेम व्यक्त केले होते. दोघेही शोच्या बाहेर अनेकदा एकत्र दिसले होते. त्यामुळे तिथे चाहत्यांनी त्यांच्या जोडीला ‘सिडनाझ’ असे नाव दिले. दोघेही काही म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसले होते. मात्र, शहनाझ गिल अद्यापही सिद्धार्थच्या मृत्यूच्या दुःखातून बाहेर आलेली नाही.

सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शहनाझ खूपच तुटली आहे. ती बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वीच ती तिच्या ‘हौसला रख’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दिसली होती. त्याचवेळी, आता या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शहनाझ सिद्धार्थला आठवून रडताना दिसत आहे.

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये सिद्धार्थला आठवून शहनाझ रडू लागते आणि नंतर तिचा चेहरा झाकते. त्याचवेळी तिच्यासोबत उपस्थित असलेला तिचा सहकलाकार दिलजीत दोसांझ तिचे सांत्वन करताना दिसत आहे. शहनाझचा हा व्हिडिओ पाहून ‘सिडनाझ’चे चाहते खूप भावुक होत आहेत.

यापूर्वी शहनाझने सिद्धार्थला ‘तू यही है’ हे गाणे समर्पित केले होते. मात्र, हे गाणे त्याच्या चाहत्यांना फारसे आवडले नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, सिद्धार्थची आई गीता शुक्ला यांनी सिद्धार्थला तिच्या दुःखावर मात करण्यासाठी मदत केली आणि तिला कामावर परत येण्यासाठी प्रोत्साहित केले.

सिद्धार्थ शुक्लाचे यावर्षी २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थने वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण टीव्ही जगत आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. एवढेच नाही, तर या बातमीवर विश्वास ठेवणे कोणालाही सोपे नव्हते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेता रोनित रॉयने सांगितले टीव्हीवर काम न करण्याचे कारण; म्हणाला, ‘माझ्याकडून छोट्या पडद्यावर…’

-खूपच वाईट झालं! कार अपघातात सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील ५ व्यक्तींचा मृत्यू

-‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरच्या मनमोहक फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष, एक नजर टाकाच

हे देखील वाचा