Wednesday, March 27, 2024

खूपच वाईट झालं! कार अपघातात सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील ५ व्यक्तींचा मृत्यू

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाबाबत एक दुःखद घटना समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मंगळवारी (१६ नोव्हेंबर) सुशांतच्या कुटुंबातील पाच व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला. रस्त्यावरील एका मोठ्या अपघातात ही घटना घडली. बिहारमधील लखीसरायमध्ये राष्ट्रीय महामार्गावरवर ट्रक अपघातात ही वाईट घटना घडली.

हाती आलेल्या माहितीनुसार, सुमो या गाडीत १० लोक चालले होते, ज्यातील ६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ५ जण सुशांतचे नातेवाईक होते. हे सगळेजण पटना हरियाणाच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी ओ.पी. सिंग यांची बहीण गीता देवी यांच्या अंतिम संस्कारासाठी चालले होते. ओ.पी. सिंग हे सुशांत सिंगचे मेहुणे आहेत.

https://www.instagram.com/p/CWVZEnNKJVW/?utm_source=ig_web_copy_link

या अपघातात बाकी लोकांची तब्येत देखील गंभीर आहे. ट्रक आणि सुमोमध्ये जोरदार टक्कर झाली आणि हा भयानक अपघात झाला. या दुर्घटनेत या गाडीच्या ड्रायवरचा देखील जागीच मृत्यू झाला आहे.

यापूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जून, २०२० रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपले होते. त्याच्या निधनाने चाहत्यांसोबतच चित्रपटसृष्टीवरही दु:खाचा डोंगर कोसळला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरच्या मनमोहक फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष, एक नजर टाकाच

-‘बिग बॉस’च्या घरामध्ये लग्न करण्यासाठी सारा खान अन् अली मर्चंटला मिळाले होते लाखो रुपये?

-पिझ्झा खाणारी ‘ही’ विचित्र महिला आहे बॉलिवूडची अभिनेत्री, नाव जाणून तुम्हीही व्हाल अचंबित

हे देखील वाचा