अनुपम खेर (Anupam Kher) काही दिवसांपूर्वी आपल्या सावत्र मुलगा सिकंदरबद्दल बोलत होते. त्यांनी म्हटलं की,’मी त्याच्यावर कधीच बापगिरी करत नाही’ बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता अनुपम खेर फक्त सिनेमांमुळेच नाही, तर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी अभिनेत्री किरण खेरसोबत (Kirron Kher) लग्न केलं आहे. जेव्हा दोघांचं लग्न झालं, तेव्हा किरण खेर यांना आधीपासूनच सिकंदर (Sikandar Khe) नावाचा चार वर्षांचा मुलगा होता. आज तो सिकंदर एक प्रसिद्ध अभिनेता आहे.सिकंदर अनेक वर्षांपासून अनुपम खेर यांच्यासोबत राहत आहे.पण तरीही लोक त्यांच्या बाप-लेकाच्या नात्याबद्दल सतत प्रश्न विचारतात.अशा या चर्चांवर अनुपम खेर यांनी काही दिवसांपूर्वी मौन सोडलं आणि स्वतःच त्यावर बोलले.काय म्हटलं होतं त्यांनी? तेच आता जाणून घ्या…
काही दिवसांपूर्वी अनुपम खेर अभिषेक व्यासच्या पॉडकास्टला गेले होते.तिथे त्यांनी आपल्या चित्रपटांबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल मस्त गप्पा मारल्या.ज्यावेळी त्यांना विचारलं की,”तुम्ही एक वडील म्हणून कसे आहात? आणि मुलांना काय शिकवता?” तेव्हा अनुपम खेर यांनी एकदम सुंदर आणि मनाला भिडणारं उत्तर दिलं. अनुपम खेर म्हणाले,”सिकंदर हा माझा सावत्र मुलगा आहे, पण आजच्या काळात मुलं आपल्या वडिलांना खरंच विचारतात का की त्यांना काय करावं?” “मी एक गोष्ट नेहमी सांगतो,मी खरं आयुष्यात कधीच ‘बापगिरी’ केली नाही. फक्त चित्रपटांमध्येच वडिलांची भूमिका केलीय”.
“जर तुम्हीही मुलांवर हुकूम चालवायचा प्रयत्न केला नाही, तर त्यांचं तुमच्याशी नातं मस्त जुळेल, आणि ते सगळं काही तुमच्यासोबत मोकळेपणानं शेअर करतील”. सिकंदर खेर हा किरण खेर यांचा पहिल्या लग्नातून झालेला मुलगा आहे. त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात 2008 मध्ये आलेल्या “वुडस्टॉक विला” या चित्रपटातून केली होती.पण खरी ओळख त्याला सुष्मिता सेनसोबतच्या ‘आर्या’ या वेब सीरिजमधून मिळाली लोकांना त्याचं काम खूप आवडलं.
तो याआधी “औरंगजेब”, “खेलें हम जी जान से” आणि “मोनिका, ओ माय डार्लिंग” या चित्रपटांमध्येही दिसला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रिलीज होण्यापूर्वीच वॉर २ ने आपल्या नावे केला हा रेकॉर्ड; पुण्याशी आहे चित्रपटाचा संबंध…